नाट्य तपस्वी मामा पेंडसे
१९२९ ते १९६९ अशी सलग ४० वर्षे मामांची रंगयात्रा व्यावसायिक रंगभूमीवर अव्याहत सुरू होती. या यात्रेमध्ये ‘आग्र्याहून सुटका’, ‘बेबंदशाही’, ‘तोतयाचे बंड’, ‘सवाई माधवरावाचा मृत्यु’, ‘भाऊबंदकी’, ‘दुरितांचे तिमिर जावो’, ‘खडाष्टक’, ‘एक होता म्हातारा’, ‘पंडितराज जगन्नाथ’, ‘स्वामिनी’, ‘सन्यस्त खङ्ग’, ‘देव नाही देव्हाऱयात’, ‘सत्तेचे गुलाम’, ‘स्वर जुळता गीत तुटे’, ‘आंधळ्यांची शाळा’, ‘लोकांचा राजा’, ‘कुलवधू’, ‘महापूर’, ‘नाटककाराच्या शोधात सहा पात्रे’ इत्यादी पन्नासएक नाटकांमधून मामांनी आपल्या लक्षवेधी अभिनयाचे दर्शन प्रेक्षकांना घडवले. […]