नवीन लेखन...

राष्ट्रीय मतदार दिवस

ज्या गोष्टीमुळे आपला भारत देश जगाला भुरळ घालत असेल तर ती बाब म्हणजे लोकशाही. या लोकशाहीला बळकट करणारी प्रणाली म्हणजे मतदान. प्रजासत्ताक दिन म्हणजेच २६ जानेवारीच्या पूर्व संध्येला राष्ट्रीय मतदार दिन साजरा केला जातो. […]

कोलगेटचा निर्माता विल्यम कोलगेट

लहानपणापासून अनेक पिढय़ांनी पांढरा आणि लाल अशा टिनमधील टुथपेस्ट पावडर ते त्याच रंगाच्या टय़ूबमधील टुथपेस्ट असा प्रवास अनुभवलेला असतो. खूप सारे पर्याय उपलब्ध नसताना टुथपेस्ट म्हणजे कोलगेट हे गणित डोक्यात पक्कं होतं. […]

राष्ट्रध्वज फडकावण्याचे नियम (ध्वजसंहिता)

इतर देशांच्या राष्ट्रध्वजांबरोबर ध्वज फडकावयाचा असेल, तर त्यासाठी असणाऱ्या खास नियमांचे पालन करावे लागते. नॉन नॅशनल फ्लॅग्ज म्हणजे कॉपोर्रेट फ्लॅग किंवा ॲ‍डव्हर्टायझिंग बॅनरबरोबर ध्वज फडकावयाचा असल्यास राष्ट्रध्वज मध्यभागीच असायला हवा. […]

दाते पंचांग कर्ते लक्ष्मणशास्त्री दाते उर्फ नानाशास्त्री दाते

१०३ वर्षापूर्वी पंचांगकार्याची मुहूर्तमेढ नानाशास्त्री दाते यांनी रोवली. पंचांग बनवताना पंचांगाचे गणित सोडवताना नानाशास्त्री दाते यांची मान आणि कंबर दुखत असे; मग त्यांनी भिंतीवर गणित सोडवायला सुरुवात केली. भिंतीचा कागद केला. नानांचे सुपुत्र धुंडीराजशास्त्री दाते यांनी या कामात लक्ष घालायला सुरुवात केली तेव्हा आधुनिकतेचं पाऊल टाकलं. […]

राष्ट्रीय पर्यटन दिवस

जगभरातील भारतातील पर्यटन स्थळांचा प्रचार करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. भारताला नैसर्गिक सौंदर्याची भूमी म्हटले जाते. […]

प्रवास शब्दकळेचा

शब्दकळेच्या प्रवासाला निघायचं ठरतं. दिवस ठरलेला असतो. हळूहळु सगळे जमायला लागतात. तहानलाडू भूकलाडू सोबत घेऊन लहानांपासून थोरांपर्यंत अगदी सगळ्या वयोगटातील शब्दकळेच्या प्रवासाला निघालेले प्रवासी एकत्रित होतात. आज एका नव्या प्रवासाला जायचं असतं. आजचं रमणीय विषयस्थान कोणतं असणार याची कुजबुज सुरु असते, किंवा ज्ञात असेल तर उत्सुकता असते. आणि या प्रवासाची वाहक, चालक, वाटाड्या, मार्गदर्शक जी all […]

सिमेपलिकडची खवय्येगिरी! (माझी लंडनवारी – 22 )

माझ्या शेजारी Allan बसायचा. तो तर नेहमीच काही ना काही खाऊ आणून आम्हाला देत होता. कधी चॉकलेट्स, कधी प्रिंगल्स, कधी क्रोशंट. तो लंचसाठी बाहेरून सलाड्स, बर्गर काही तरी आणायचा स्वतःसाठी आणि आम्हाला काही ना काही ऑफर करायचा. आपले इंडियन पदार्थ त्याच्या पोटात जायचे. किती आवडत होते कोण जाणे? पण तो ते एन्जॉय करत असावा. […]

कां तुझे गं, मज वेड असे

असे कसे गं असे कसे. कां तुझे गं मज वेड असे वेळी, अवेळी केव्हांही नेत्री सामोरी गं तूच असे।। नित्य प्रभाती त्या नभाळी तांबूसलेल्या सांजसकाळी आठविताच सहजी तुजला खुदकन मनी मीच कां हसे।। हिरव्या वेली, कोमल कळी अलवार, जणू तूंच उमलते पाकळी पाकळी अधर तुझे मकरंदा गंध तुझा कां असे।। निर्मल, शामल तुझी गं तनू माळूनी […]

जगाच्या इतिहासातलं मोठं वादग्रस्त व्यक्तिमत्त्व विन्स्टन चर्चिल

बीबीसीने २००२ मध्ये घेतलेल्या ‘१०० सर्वश्रेष्ठ ब्रिटन्स’ या जनमत चाचणीत चर्चिल यांनाच पहिल्या क्रमांकाची मते मिळाले. सर्वेक्षणानुसार चर्चिल यांनी साहित्यिक शेक्सपीअर, समाजशास्त्रज्ज्ञ चार्ल्स डार्विन आणि अभियंते ब्रुनेल यांना मागे टाकलं होते. […]

गोष्ट “अशी” संपायला नकोय !

११ जानेवारीला अल्वार हून पंतनगर च्या वाटेवर असताना, मित्राने व्हाट्सअपवर कळविले – ” लता मंगेशकर आय सी यू त -कोरोनाची बाधा !” व्हाट्सअप विद्यापीठावर मी शक्यतो विश्वास ठेवत नाही म्हणून घरी पत्नीला तातडीने फोनलो – ” टीव्ही वर काही वृत्त आहे का बघ आणि कळव. ” […]

1 332 333 334 335 336 361
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..