कृपा दयाघनाची
हॄदयस्थ ब्रह्म.! नित्य नांदते आहे! अंतरीचे भावशब्द स्वरी गुंफले आहे! स्वरात मी दंगलो भान हरपलो आहे! आलाप गंधर्वांचा षड्जाचाच आहे! अव्यक्त प्रीतीभाव शब्दी सांडले आहे! तृप्त मी, तृप्त मी जीवन सुखद आहे! लाभले सारेच संचिती दान आहे! कृपा दयाघनाची मीही कृतार्थ आहे! — वि.ग.सातपुते.(भावकवी) 9766544908 रचना क्र. १६३. २७ – १२ – २०२१.