नाट्यदर्पण रजनी चालवणारे सुधीर दामले
नाट्यदर्पण’चे सुधीर दामले हे त्याकाळी ‘नाट्यदर्पण’ नावाचे एक मासिकही चालवत असत. त्याला जोडून त्यांनी १९७५ साली ‘नाट्यदर्पण रजनी’ सुरू केली होती. मराठी नाट्य आणि चित्रपट क्षेत्रातल्या विविध कलाकारांना त्या सोहळ्यात पुरस्कार दिले जात. हिंदी सिनेमाच्या क्षेत्रात ‘फिल्मफेअर ॲवॉर्ड्स’चे जे स्थान आहे तेच मराठी कलाजगतात या ‘नाट्यदर्पण सन्मानचिन्हां’ना मिळाले होते. […]