नवीन लेखन...

घटा घटांचे रुप आगळे

सदाशिव पेठेत माझं बालपण गेलं. रस्त्यावरच घर असल्याने जाता येता रस्त्यावरील माणसांचं निरीक्षण करण्याचा मला त्यावेळी छंदच लागलेला होता. कळायला लागल्यापासून केशव कुलकर्णीला मी पहात होतो. […]

वृक्ष देई आधार युगें न युगें (सुमंत उवाच – १२०)

निसर्ग आहे म्हणून आपण आहोत, वृक्षांची सगळ्यात जास्त गरज ही माणसाला आहे. सावली घेण्यासाठी माणूस वृक्षाचा आधार घेतो, पावसा पासून संरक्षण मिळावे म्हणून आपण वृक्षाच्या खाली उभे रहातो. […]

छोटीसी बात चित्रपट

अमोल पालेकर या सिनेमात larger than life असलेल्या भूमिकेत कधीच नव्हता. कुठल्याही गर्दीत दिसणारा तो एक सामान्य माणूस होता. उगाच व्हिलनच्या खिशात चावी ठेवून “चाबी अब मै तेरे जेब से निकाल कर हि ये ताला खोलुंगा पीटर” म्हणत हिरोगिरी करणाऱ्याच्या भानगडीत तो कधी पडला नाही. […]

कुस्करलेली कळी – उमललेले फुल – १८

गेल्या ५/६ दिवसात मौशुनी भूतान देशातील विविधता पाहिली, रीन्पोंची बोलण्याची पद्धत, आत्मविश्वास, आदराची भावना या सर्व गोष्टींचा खोल परिणाम तिच्या मनावर झाला होता. तिला एक वेगळेच जग पाहण्यास मिळाले होते, पण मनाच्या दुसऱ्या कप्प्यातून तिचा भूतकाळ उलगडू लागला होता. […]

रविवार

आताही रविवार येतात पण आवडत नाही कारण या दिवशी आईबाबा मुलांना घेऊन एक तर फिरायला म्हणजे गावाला जाणे. किंवा जे सकाळी जातात ते रात्रीचे जेवण करूनच येतात. घरात कामे नसतात. मुलगी जर जवळपास असेल तर तिच्या कडे पण हेच असेल कदाचित. थोडा फार फरक असेल पण रविवारी येत नाहीत. […]

भूपृष्ठाची निर्मिती

पृथ्वीचा असा खोलपर्यंत घट्ट झालेला हा जाड पृष्ठभाग म्हणजेच आजचं शंभर-दीडशे किलोमीटर जाडीचं पृथ्वीभोवतीचं घन स्वरूपातलं भूपृष्ठ! या भूपृष्ठाच्या निर्मितीच्या वेळी पृथ्वीचं वय होतं जवळजवळ एक अब्ज वर्षं. पृथ्वीवर खनिजांची निर्मिती होऊ लागली पृथ्वीच्या जन्मानंतर सुमारे दहा-पंधरा कोटी वर्षांनी; त्यानंतर आणखी सुमारे ऐंशी कोटी वर्षांनी पृष्ठभागाला आजचं स्वरूप प्राप्त झाल्याचं यावरून दिसून येतं. […]

नव्याची नवलाई (माझी लंडनवारी – 10)

लंडन शहराचे सहा झोन्स् मध्ये वर्गीकरण केले होते.  झोन 1, जिथे मी आत्ता रहात होते.  झोन 1 हे लंडनच्या प्राईम लोकेशन मध्ये येते. हा सेंटर धरला तर झोन 2  पासून झोन 6 पर्यंत  वर्तुळाकार आकारात झोन पसरत होते. […]

योग: कर्मसु कौशलम्

कर्माच्या दोरीवरून चालताना दुसर्या बाजूचा तोलही सांभाळावा लागतो. ही दुसरी बाजू अपेक्षांची! मी एवढं केलं सगळ्यांसाठी पण कुणाला काही नाही त्याचं. साधं थँक्यू म्हटलं नाही. ..वाईट वाटतं. अगदी खरं आहे. पण हळूहळू ते वाईट वाटणं ही कमी व्हायला हवं. कारण ते वाईट फक्त आपल्याला वाटत असतं. ज्याला ते कळायला हवं त्याच्या ते गावीही नसतं. ‘योग: कर्मसु […]

सकाळ वृत्तपत्राचे संस्थापक नारायण भिकाजी परुळेकर उर्फ नानासाहेब परुळेकर

केवळ एकट्याच्या हिमतीवर त्यांनी १ जानेवारी १९३२ रोजी ‘सकाळ’ चा पहिला अंक प्रकाशित केला. सुरुवातीची काही वर्षे नानासाहेबांसाठी खडतर गेली. आर्थिक मंदी आणि आर्थिक ओढाताण यांमुळे सर्व व्यवहार काटकसरीने करावे लागत. आर्थिक विवंचनेतून कुठे सुटका होते, तोपर्यंत संपादकीय आणि व्यवस्थापकीय समस्या डोकं वर काढत. […]

चीनचे माजी राष्ट्राध्यक्ष हू जिंताओ

जिंताओ यांनी १९९८ ते २००३ या काळात चीनचे उपराष्ट्राध्यक्ष म्हणून काम पाहिले होते. त्यानंतर २००२ साली चिनी कम्युनिस्ट पक्षाच्या महासचिवपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली होती. […]

1 349 350 351 352 353 361
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..