नवीन लेखन...

फोन टॅपिंग

कुख्यात चंदन तस्कर वीरप्पन कसा मारला गेला, बटला हाऊस एनकाउंटर का घडू शकले, उत्तर प्रदेशातील गुंड श्रीप्रकाश शुक्ला याला मारण्यात यश कसे मिळाले या तीनही प्रश्नांचे उत्तर एकच आहे ते म्हणजे फोन टॅपिंगमुळे हे शक्य झाले. दिल्लीत किमान सहा हजार लोकांचे फोन टॅप होतात, तर महानगरांमध्ये १० ते २० फोन गुप्तचरांच्या किंवा पोलिसांच्या नजरेखाली असतात असे आता स्पष्ट झाले आहे. […]

तुका आकाशा एवढा

अनघा प्रकाशन दिवाळी अंक २०१६ मध्ये सौ. माधुरी विजय भट  यांनी लिहिलेला हा लेख श्री ज्ञानेश्वरांनी पाया घातलेल्या भागवतधर्माच्या मंदिरावर कळस चढविण्याची कामगिरी देहूच्या तुकोबारायांनी पार पाडली. जगामध्ये पूर्वीपासून तसेच आजही भारतीय अध्यात्मविद्या हीच अग्रणी राहून मार्गदर्शन करीत आहे. भारतीय संतांनी विशेषतः महाराष्ट्रातील पाचही संप्रदायातील संतांनी प्रपंच आणि परमार्थाची सांगड घालून समाजाला सुखी जीवनाचा मूलमंत्र दिला. […]

अर्धशतकी त्रिवेणी – तो, मी, पडदा !

” गहरी चाल ” अशा आकर्षक नावाच्या चित्रपटाने फसवणूक झालेला मी रिकाम्या हातांनी बाहेर पडल्यामुळे चिडलो होतो पण भुसावळच्या वसंत टॉकीज मध्ये “जंजीर” पाहताना दचकून ताठ बसलो – ” ये पुलिस स्टेशन हैं, तुम्हारे बाप का घर नहीं ! ” पडद्यावर प्राणही तितकाच दचकला असावा. आणि आज तो /जया सोडले तर त्या अंगारांचे साक्षीदार (प्राण, इफ्तेकार, ओम प्रकाश, अजीत, प्रकाश मेहरा) निघून गेले आहेत. […]

खल्वायन रत्नागिरी, सादर करीत आहे …

असे शब्द कानावर पडले की सुरू होते एखादी सुरेल मैफल , एखादं संगीत नाटक , एखादं गद्य नाटक , एखादी संगीत स्पर्धा किंवा एखादं प्रशिक्षण शिबीर …आणि सगळ्याच वयोगटातील रसिक आतुरतेनं समोरच्या रंगमंचाकडे पाहू लागतात. हे आजचं नाही . गेली २५ वर्षे अव्याहतपणे , अविरत सुरू आहे संगीताचा अवीट प्रवाह. दर महिन्याच्या दुसऱ्या शनिवारी मैफल रंगत असते . […]

बहुआयामी व्यक्तिमत्व वीर सावरकर – १६ – सावरकर व समर्थांची साम्यस्थळे

रामदास व सावरकर या दोघानी लहानपणी बलोपासना केली. समर्थ रामदास रोज बाराशे नमस्कार घालीत तर सावरकर जोर बैठका , पोहणे,धावणे डोंगर चढणे असा व्यायाम करीत. त्यामुळे दोघांचेही शरीर काटक व सोशीक बनले होते. लहानपणी दोघेही देव भक्त होते. मोठेपणी दोघांनाही  खरा देव कोणता याची ओळख पटली. […]

डासाच्या पुनरउत्पादनाचे जीवनचक्र – भाग ३

माणसाच्या शरीरात चालणारे मलेरिया परोपजीवांचे जीवनचक्र १) डास मनुष्याला चावतो त्यावेळी डासाच्या लाळग्रंथीत तयार झालेल sporozoites लाळे मार्फत मनुष्याच्या कातडीखाली सोडले जातात. त्यांची वाढ अजून पूर्णपणे झालेली नसल्याने ते एकदम तांबड्या पेशींवर हल्ला करू शकत नाहीत. या परोपजीवांच्या अवस्थेला Pre Erythrocytic schizogony असे म्हणतात. २) कातडीच्या खालील भागात शिरलेल sporozoites फिरत फिरत मनुष्याच्या यकृतात येऊन स्थिरावतात […]

भावानुबंधाची पुनर्भेट

कधी कधी आयुष्याच्या धावपळीत अचानक काही निवांत क्षण वाट्याला येतात, ते आपण प्लॅन केलेले नसतात. ते अवचित वाट्याला येतात. एखादे स्वप्न पडावे तसे. आणि आपण त्या जागेपणीच्या स्वप्नात अक्षरश: रंगून जातो. आपण आपली कामे, विवंचना, किंबहुना आपले वयही विसरतो. आपल्यासमोर उभा असतो एखादा निवांत–मोकळा आठवडा. आपण त्याची कधी कल्पना स्वप्नात देखील केलेली नसते. […]

रुपयाची किंमत

रुपयाचे मूल्य घसरतेय, त्याचे ‘अवमूल्यन’ होतेय, अशा बातम्या आपण नेहमीच वाचतोय, ऐकतोय! मग रुपयांचे मूल्य म्हणजे काय? ते मूल्य कशावरून ठरते? रुपयाचे मूल्य घसरते म्हणजे नक्की काय होते? त्याचे परिणाम काय होतात? त्यावर उपाय कोणते? […]

सत्य दृष्टांत

कुठुनशी येते नित्य कविता मलाच माझे कळतच नाही झुळझुळते वास्तव शब्दांचे कसे ते मजला कळत नाही निर्बंधी मी क्षण टिपतो सारे मनशब्दां बांध घालित नाही सत्य दृष्टांता स्वछंदी गुंफितो इमले कल्पनांचे रचित नाही भावनांच्या त्या शब्दफुलांवर मी अन्याय कधी करीत नाही शब्दशब्द, दानच दयाघनाचे मी अलगद वेचणे सोडित नाही शब्दभावनांच्या अथांग सागरी मी डूंबायाचे कधी सोडित […]

ठाण्यातील नाट्यसंस्था – आदर्शमित्र मंडळ

हिंदी नाट्यस्पर्धेत भाग घेऊन पारितोषिके मिळवणे ही आदर्श मित्र मंडळाची खासियतच. गडकरी रंगायतन सुरू झाल्यावर ठाणेकर कलाकारांनी सादर केलेले पहिले नाटक केशवराव मोरे यांनीच दिग्दर्शित केले होते. […]

1 37 38 39 40 41 361
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..