नवीन लेखन...

आत्मानंद

जगुनीया झाले सारे काही आता मागणे काहीच नाही… कसले सुख, कसले दुःख संवेदना काहीच उरली नाही… प्रारब्ध संचिती जन्म लाभला भोगायचे काही राहिले नाही… उरलेले क्षण आनंदात जगावे आता कुणाला दुःखवू नाही… लौकिक , भौतिक नश्वर सारे सोबत कधीच काही येत नाही… आत्मानंद ! केवळ मन:शांती याविण दूजे सुंदर सत्य नाही… — वि.ग.सातपुते (भावकवी) 9766544908 रचना […]

वैफल्य

निरर्थक शब्दांची दाटी, का होते कुणास ठाऊक काहीच कळत नाही सजवलेली शय्या, ताटी का होते कुणास ठाऊक काहीच कळत नाही ॥ १ ॥ मनातले उमटत नाही कुणास ठाऊक का म्हणून सुटा पसारा जुळतच नाही कुणास ठाऊक का म्हणून ॥२ ॥ वेड्यागत हव्यास का हा सामान्यतेहून दूर जाण्याचा धडपडूनही जेव्हा फसतो प्रयत्न हिमालयाला छेदण्याचा ॥ ३ ॥ […]

मती गुंग होते

कधी कधी मती गुंग होते माणुस कधी कळत नाही भेटीसाठी कुणी उताविळ तर कुणी, बोलतही नाही….। बंद दरवाजे, बंद खिडक्या कोण शेजारी कळत नाही मी आणि फक्त कुटुंब माझे संसारी दुसरे कुणीच नाही….। संवादही सारे खूंटले आता प्रेमवात्सल्यही जगले नाही व्यवहारी, जग हे झाले सारे कुणा कुणाची फिकिर नाही….। सुसंस्काराची सुकली माती ओल, कुठेच झिरपत नाही […]

संतांचे सामाजिक कार्य आणि तुकाराम

अनघा प्रकाशन दिवाळी अंक २०१६ मध्ये मिलींद सुधाकर जोशी यांनी लिहिलेला हा लेख सामाजिक दृष्टीने संतकार्याचे परीक्षण करण्याचे अनेक प्रयत्न आजवर अनेक विचारवंतांनी केलेले आहेत. महात्मा फुले, न्यायमूर्ती रानडे, लोकमान्य टिळक न. र. फाटक, वि. का. राजवाडे, गं. बा. सरदार, रा. चिं. ढेरे, वि. भि. कोलते, प्रा. सदानंद मोरे यांच्यासारख्या अनेक व्यासंगी विद्वानांनी या बाबत आपली […]

डॉ. रोनाल्ड रॉस यांच्या जीवनाची यशोगाथा – भाग १०

मलेरियाच्या संशोधनातील महत्त्वाचे शास्त्रज्ञ व नोबेल पारितोषिक विजेते मलेरिया विषयक संशोधनात रॉस खेरीज अनेक युरोपियन शास्त्रज्ञ आघाडीवर होते. किंबहुना काही संशोधकांनी मलेरियाच्या परोपजीवांचा सखोल अभ्यास डॉ. रॉस या क्षेत्रात पडण्यापूर्वीच सुरू केला होता. त्या सर्वांचा या संशोधन मार्गावरील इतिहास हाही तितकाच मनोरंजक आहे. अल्फानॉस लॅव्हेरान याचा जन्म फ्रान्समधील एका बुद्धिमान कुटुंबात झाला. वैद्यकीय शास्त्रामधील मेडिसीन व […]

राम नाम ओठी जपता

राम नाम ओठी जपता रामराया हॄदयी वसतो… करावा रामनामाचा धावा तो सदैव श्वासात नांदतो… राम नाम सागर मोक्षानंदी दुःख वेदनांतुनी सावरतो… राम अवतार विश्वात्म्याचा साऱ्या ब्रह्मांडाला रक्षितो.. तो देवगुणी , सदविचारी सकलांच्या मना उजळीतो.. विध्वंसक तो षडरिपूंचा शाश्वती ब्रह्मांडी नांदतो… जीवन रामनामी सन्मार्गी जाणता जीवा मोक्ष लाभतो.. — वि.ग.सातपुते (भावकवी) 9766544908 रचना क्र. २२९ ८/९/२०२२

ठाण्यातील नाट्यसंस्था – कलायतन

या संस्थेने शासनाच्या नाट्यस्पर्धेत अनेक पारितोषिके मिळविली. यशवंत रांजणकर यांच्या ‘जिद्द’ या नाटकाला दिग्दर्शनाचे पारितोषिक, तर अभिनयाचे प्रथम पारितोषिक चंदा रणदिवे यांना मिळाले. त्यानंतर प्र. के. अत्रे यांच्या ‘भ्रमाचा भोपळा’ या नाटकात मनोहर कारखानीस, उषा गुप्ते यांना उत्कृष्ट अभिनयाची बक्षिसे मिळाली. ‘प्रेमा तुझा रंग कसा’, ‘कवडीचुंबक’ या व इतर अनेक नाटकांचे प्रयोग सामाजिक संस्थांच्या मदतीसाठी महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राबाहेरही सादर केले गेले. अशा रितीने या संस्थेने 50 वर्षांपूर्वीच ठाण्यात नाट्यचळवळ यशस्वीरित्या रुजविली. […]

बहुआयामी व्यक्तिमत्व वीर सावरकर – १४ – स्थितप्रज्ञ सावरकर

सावरकर यांनी  लहानपणापासून सतीच वाण पत्करले होते. हजारोंच्या घरी पुढेमागे सोन्याचा धूर निघावा म्हणून आपली चूल बोळकी वयाच्या विसाव्या वर्षी फोडून टाकली होती. […]

युरोप ऑन रेल (युरेल) आणि युरो स्टार – भाग ४

जर्मनीमधील ट्युबिन्गन या छोट्या गावात जाण्याकरता स्वित्झर्लंडमधील झुरीक या स्टेशनवरून छोटी, धुराच्या इंजिनाची गाडी होती. दोन तासांचा प्रवास सुखाचा होता. जर्मन सरहद्दीवरील एका स्टेशनवर पाटी लिहिलेली वाचली आणि क्षणभर धडकीच भरली. ‘तंबाखू व तत्सम पदार्थ बाळगण्यास बंदी असून तसे आढळल्यास कायदेशीर इलाज केला जाईल.’ मुंबईहून निघताना आमच्या एका मित्राने जर्मनीतील एका मैत्रिणीस भेट म्हणून अस्सल भारतीय […]

कुणाकुणासाठी कोठपर्यंत…. कुणी का रडावे

कोण होतो, आहे कुठे, कुठे हा जाईन कोण जाणे, किती वळणे कशी मी पाहीन कुणाकुणाचे कोण जाणे कसे कधी नाते जडावे कुणाकुणासाठी कोठपर्यंत कुणी का रडावे! आगीने हृदयस्थ माझ्या सागर टाकावा गिळून मस्तकाच्या ठिकऱ्या – ठिकऱ्या काळीज माझे छेदून शून्यातल्या सुरुवातीने पुन्हा शून्यात का विरावे कुणाकुणासाठी कोठपर्यंत कुणी का रडावे? मनी जन्मलेल्या स्वप्नाने का मला पोरके […]

1 41 42 43 44 45 361
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..