इंदिराजींचा राजकारणात प्रवेश
१९५५ सालातील गोष्ट. काँग्रेस अध्यक्ष यू. एन. ढेबर आणि लाल बहादूर शास्त्री यांनी नेहरूंबरोबर काँग्रेस पक्षामध्ये वरिष्ठ पातळीवर काही सदस्यांची नेमणूक व्हावी यासाठी चर्चा केली. असा विचार होता की, हे सदस्य तरुण असावेत व ते पक्षकार्यासाठी उपयुक्त असावेत. डझनभर नावे विचारार्थ आली होती. त्यात इंदिराचे एक नाव होते. शास्त्रीजी व ढेबर यांनी इंदिरेला विनंती केली, की तिने युवकांचे व महिला विभागाचे नेतृत्व करावे. […]