भावस्पर्ष कृपाळू
मी अलवार कवटाळीतो अंतरीच्या गतआठवांना हॄदयस्थ, ते ध्यास भास स्मृतींनाच, उलगडताना…. भावस्पर्ष ! मृदुल कृपाळू जगविती माझ्या स्पंदनांना अबोल ओंजळ भावनांची मी, रिती कुठे करू कळेना…. दिव्यत्व,भक्तीभावप्रीतीचे वेदनांची, क्षालनी सांत्वना ओघळ लोचनी जाणिवांचे स्मृतींचा, गंधाळ हुंगतांना…. माथी आभाळ सावळबाधी सांजवेळी हुरहुर पाऊलांना ओढ, हरिपावरीच्या सुरांची मी नित्य आळवितो दयाघना…. — वि.ग.सातपुते (भावकवी) 9766544908 रचना क्र. २३२ […]