ओळख महाराष्ट्रातील जंगलांची: भाग १० – खाजण अथवा खारफुटी वने
जगातील ६० टक्के लोक किनाऱ्यापासून ६० कि. मी.च्या प्रदेशात राहतात. साहजिकच किनारी भागातील लोकांना पुरातन काळापासून हवा, वनस्पती व त्यांचे महत्त्व माहीत होते. खारफुटी- संदर्भात दंतकथा, इतिहास ज्ञात आहे. भारतापुरते बोलायचे तर चेन्नईजवळ चिदम्बरम् येथील नटराजाच्या देवळात एका खारफुटीच्या झाडाची ‘स्थल वृक्ष’ म्हणून एक मूर्ती स्थापन केली आहे. भाविक आजही तिला पूजतात. सुंदरबनात ‘बनबिबी’ नावाची देवता […]