नवीन लेखन...

जीवलगा

सखया, किती वेळ मी वाट तुझी पाहू रे…. जाहली तिन्हीसांजा गाभारी दीप दीपले रे… नको आता जीवघेणी असह्य ती, प्रतीक्षा रे… जीवलगा, जीवलगा किती पाहू मी वाट रे… तुलाच भेटण्यासाठी कासावीस हा प्राण रे… ये नां, सत्वरी धावत बघ झाकोळले गगन रे… ******* –वि.ग.सातपुते (भावकवी) 9766544908 रचना क्र.२१७ २७/८ /२०२२

निश्चयाचे महामेरू : छ. शिवराय व तुकोबा

अनघा प्रकाशन दिवाळी अंक २०१६ मध्ये श्रीराम अनंत पुरोहित  यांनी लिहिलेला हा लेख महाराष्ट्र ही अगदी प्रथमपासूनच संतांची आणि वीरांची भूमी म्हणून सर्वांना सुपरिचित आहे. अठरापगड जातीचे वास्तव्य असलेल्या या भूमीमध्ये प्रत्येक जातीमध्ये संत आणि शूरवीर जन्माला आले असून आजदेखील ते सर्वांना परम वंदनीय ठरलेले आहेत. त्यातही वारकरी सांप्रदायाचा पाया रचलेले संत श्री ज्ञानेश्वर माऊली, संतशिरोमणी […]

अनवट-सीता रामम !

१९६५ आणि १९८५ साली मानव्य आणि प्रियकर-प्रेयसी यांच्यातील प्रेम किती जिवंत,हळुवार, रसरशीत, नाजूक आणि भिडून जाणारं होतं याचा प्रत्यय काल “सीता रामम ” बघताना आला. मूळ भाषा तेलगू असली (with English subtitles) तरी दर्जेदार कलाकृती कायम भाषेच्या अडसरांना ओलांडून “ये हृदयीचे ते हृदयी ” पोहोचविते याचा हा दुसरा अनुभव. पहिल्यांदा पुलंनी कौतुक केलेला “शंकराभरणं ” एका […]

गाडी घुंगराची

अशा बैलगाड्या पाहिल्या की पूर्वीची आठवण येते पूर्वी वाहने फार कमी होती. बैलगाडी किंवा सायकल असे प्रवासाचे साधन असायचे. पूर्वीची बैलगाडी व गाडीला झुंपलेली दोन बौले त्यांच्या अंगावर टाकलेले रेशमी वस्त्राचे. रंगीबेरंगी आरशाने नटलेले बैलाच्या अंगावरील झूल अतिशय सुंदर दिसायचे. गाडीत बसलेला शेतकरी त्याच्या डोक्याला बांधलेला टावेल. दोन हातात बैलांची कासरी चाबूक पाठीमागे बैलगाडी मध्ये बसलेली. […]

जिम कॉर्बेट – भाग १

मनसि वचसि काये पुण्यपीयूषपूर्णा: । त्रिभुवनमुपकार श्रेणिभिः प्रीणयन्तः ।। परगुणपरमाणून्पर्वती कृत्य नित्यम । निज हृदि विकसन्तः सन्ति सन्तः कियन्तः ॥ -भर्तृहरि ज्याचे मन, वचन व शरीर पुण्याच्या अमृताने परिपूर्ण आहे, आपल्या परोपकारी वृत्तीने जे सर्वांना आनंदित करतात, दुसऱ्याच्या गुणांचे आचरण करतात, रंजल्या गांजल्या लोकांना आसरा देतात, त्यांच्या सुखदुःखात सहभागी होतात, निरपेक्ष वृत्तीने राहतात अशी सज्जन माणसे […]

हळहळ

सांग नां ! आतातरी नाते तुझे नी माझे…. क्षण मी विसरु कसे प्रेमात हरविले माझे…. आज मी इथे, तू इथे तुज शोधिते मन माझे…. भास तुझाच अंबरात त्यात गुंतले श्वास माझे…. क्षिणली, सारीच गात्रे व्याकुळले हृदय माझे…. आज अधीर लोचनी तूं हळहळते अंतरंग माझे…. –वि.ग.सातपुते.(भावकवी) 9766544908 रचना क्र. २१८ २८/८/२०२२

मोहविते मनास माझिया

मोहविते मनांस माझिया क्षितिजावरची सांज सुंदर जीवनाचे प्रतिबिंब मनोहर स्मृतीत रंगले केशरी अंबर किती, काय कसे स्मरावे अव्यक्त प्रीतीचे नाते सुंदर रेंगाळलेली, सांज लोचनी मोहविते मनांस नीळे अंबर सुख, दु:खांची ऊन सावली भावनांचेही घुटमळणे सुंदर ओढ़ मनांतरी सत्य प्रीतीची हॄदयी, नाचतो मनमोर सुंदर — वि.ग.सातपुते (भावकवी) 9766544908 रचना क्र. २४५ २३/९/२०२२

कासाविस पाझर

मन हे वेडेच वेडे माझे कसे समजावू या मनाला वात्सल्यप्रीत अनिवार्य जीवा त्याच्याच ध्यास सदा जीवाला लळा, जीव्हाळा दैवदान ऋणानुबंधी लाभतो मानवाला संचिती मोहोळ आठवांचे जगविते नित्य मनांतराला कासावीस ओघळ पाझरांचे सांगा कसे समजावू मनाला वेदनांचा आकांत अंतरी सुन्न करितो व्याकुळ जीवाला — वि.ग.सातपुते (भावकवी) 9766544908 रचना क्र.२४२ २०/९/२०२२

अस्सल नाट्यधर्मी वि. रा. परांजपे

वेगवेगळ्या निमित्ताने ठाण्यातील हौशी, उत्साही नाट्यवेड्यांना एकत्र आणून त्यांचे नाट्यप्रवेश बसविणे, त्यांना अभिनयाचे मार्गदर्शन करणे हा जणू परांजपेसरांचा ध्यासच होता. 1996 साली नटवर्य मामा पेंडसे यांच्या स्मृती जागविताना परांजपेसरांनी स्वत ‘खडाष्टक’ आणि ‘भाऊबंदकी’मधला जो प्रवेश सादर केला, तो पाहून ज्येष्ठ अभिनेते भालचंद्र पेंढारकर यांनी ‘अविस्मरणीय’ अशी दाद दिली होती. […]

नवं -जुनं !

अनेक वर्षांपूर्वी मी ठाण्याला असताना वंदना चित्रपटगृहात आमिरचा “सरफरोश “बघितला होता आणि तेथील नैसर्गिक उकाड्यात इतका उबलो की तो चित्रपट आत पोहोचलाच नाही. नंतर काही वर्षांनी दूरदर्शनवर पाहिला आणि चक्क आवडला. […]

1 50 51 52 53 54 361
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..