नवीन लेखन...

तृप्तलो आता

मालवुनी टाक रे, दीप तू आता मन शांत जाहले, तृप्तलो आता.. उजळल्या अंतरी, नाना गतस्मृती थकलो स्मृतींचे, भार पेलता पेलता.. कोवळी मध्यान्न, गेली सांजाळूनी सांजेसवे लपली, यामिनीच आता.. निवता लोचने, हुरहुर स्पंदनांना चैतन्य सरता सरता जागे अंतरात्मा.. मालवुनी टाक रे, दीप तू आता.. मन शांत जाहले, तृप्तलो आता.. — वि.ग.सातपुते (भावकवी) 9766544908 रचना क्र.२३९ १८/९/ २०२२

नाट्यभूमीचा मुसाफिर : डॉ. मुरलीधर गोडे

ठाण्याच्या धुळीधुळीच्या कणाकणांत नाटक सामावलेले आहे. त्यामुळे ठाण्यात जन्मलेल्या मुरलीधर गोडे यांच्या नाकातोंडात हे नाटकाचे धूलिकण न घुसते तरच नवल! त्यांचे शालेय जीवन महाडच्या परांजपे विद्यामंदिरात गेले. विद्यार्थी असताना मो. ग. रांगणेकरांच्या ‘आशीर्वाद’ व ‘माझे घर’ या नाटकात आणि ‘ध चा मा’ या ऐतिहासिक नाटकात अभिनय करून त्यांनी रंगभूमीवर पदार्पण केले. एम.ए., बी.एड्. झाल्यानंतर १९६३ पासून […]

शब्द, शब्द, शब्द, शब्द!

गुलज़ारचा ऐकीव दिनक्रम (म्हणजे माझ्या कानी आलेला)- रोज सकाळी सारं आवरून तो त्याच्या लेखन टेबलावर नियमित बसतो आणि नेटाने लेखन करीत असतो. मीही ती दैनंदिन शिस्त स्वतःला बऱ्यापैकी लावत आणलीय. विशेषतः फेब्रुवारी २०२० पासून सुरु झालेल्या स्तंभलेखनाने (हा आयुष्यातील पहिलाच लेखनप्रकार) मला सातत्याची शिस्त लावलीय. घड्याळ असते सोलापूरला पण दर शुक्रवारी नवा लेख लिहायला सुरुवात करून तो सोमवार रात्रीपर्यंत पाठविला तरच तो पुढच्या रविवारी येतो हे नवं आक्रीत आता अंगवळणी पडलंय आणि जमतंय. […]

बहुआयामी व्यक्तिमत्व वीर सावरकर – ४ – सावरकरांची गुण ग्राहकता

सावरकरांनी १९२९ साली सन्यस्तखड्ग नाटकावर पुण्याच्या श्री. वि.ना. कोठीवाले यांनी टीकात्मक लेख लिहिला तो वाचून सावरकरांनी त्यांना भेटीसाठी बोलावले. व म्हणाले “ तुम्ही माझ्या भाषेतल्या दोषावर टीका केलीत ती बरोबर आहे.पण मराठी नाटके बहरत असताना मी अंदमान येथे तुरुंगात होतो,त्यामुळे मला सद्यस्थितीतिल नाटकाची  भाषा अवगत नाही, मी मराठी नाटकेही मी पहिली नाहीत,पण नाटकाच्या नावाचे जे विवेचन केले आहे ते अगदी योग्य आहे. व लोकापुढे मांडून माझं ध्येय साध्य केले आहे.” […]

एका कुटुंबाची गोष्ट – भाग ३ (आठवणींची मिसळ २८ ब)

मला मात्र वंश वगैरेची चिंता आता एकविसाव्या शतकांत योग्य वाटत नाही. “मुलगी शिकली, प्रगती झाली.” हे वचन सर्व बहिणींनी सिध्द केले. तिसऱ्या पिढीतल्या सगळ्या मुली पदवीधर झाल्या. त्यांनी नोकऱ्या केल्या. सगळे मुलगे नाही शिकले. मुलींनी दुसऱ्या घरांत जाऊन त्या कुटुंबांच्या आधार बनल्या. आणखी काय हवं ? दुसऱ्या भागापर्यंत करूण वाटणारी गोष्ट, ह्या मुलींच्या मुलांची व मुलींच्या उत्कर्षाची माहिती मिळाल्याने ती गोष्ट आता सुखान्त झालेली पाहून मला खूप आनंद झाला. आणि तो तुमच्याशी वाटून घ्यावा म्हणजे दुणावेल असेही वाटले. […]

देवाचा तराजू

देवा तुझ्या तराजूला एक पारडे जड का माणसाच्या ठोकळ्याला दोन हाती माप का दुर्जनांच्या पारिपत्या जन्मतो तो तूच ना हिंदवीला आगऱ्याची मग सांग ना रे कैद का शुभ्रतेच्या ज्योतीसंगे काजळी किनार का जीवनाच्या धुंद क्षणी आसवांची धार का बेरजेचा गोफ भाळी एखाद्या गुंफतोस नातं नशीबी वेदनांचं एखाद्या जोडतोस निर्जीव ठोकळ्याला विकारांची चेतना का दिव्यत्वाच्या झेपाव्याला अपूर्णतेची […]

वैभव शब्दांचे

मी मनामना जोडित राहिलो.. मी माणसा माणसात राहिलो… नाही कधीच क्षणभर थांबलो नाही कुणास बोचलो टोचलो… जग सारे मायबाप बंधुभगिनी समजुनी जगती जगत राहिलो… काय मिळविले, काय हरविले या विचारात न मी कधी गुंतलो… देणे घेणे हिशेब सारे संचिताचे असे समजुनी समाधानी राहिलो… वैभव! शाब्दिक प्रेमभावनांचे मीच सदोदित मिरवित राहिलो… तळहातांच्या ठळक रेषामधुनी मीच मन:शांती शोधित […]

स्पर्श जाणिवांचा

येता पहाट चैतन्याची जीव अलवार जागतो प्रसवता किरण रविचे आत्मा, ब्रह्मांडी रमतो… स्पर्श जाणिवांचा नित्य मनभावनांशी खेळतो इच्छा प्रत्येकाची वेगळी जो तो स्वसुखा शोधतो… कालचक्र हे पूर्वकर्माचे जीव नित्य इथे भोगतो क्षण सारेच अनोळखी ओंजळीत झेलित राहतो… जीवाजीवा उद्याची चिंता हा बेभरोसा असह्य होतो नियती चक्र सांजाळणारे अंतरी अंधार दाटुनी येतो… –वि.ग.सातपुते. (भावकवी) 9766544908 रचना क्र.२१० […]

तुकारामांच्या आरत्या आणि इतर अभंग

दत्तावरील अभंग तीन शिरे सहा हात । तया माझा दंडवत ।। काखे झोळी पुढे श्वान । नित्य जान्हवीचे स्नान ।। माथां शोभे जटाभार । अगी विभूती सुंदर ।। शंख चक्र गदा हाती । पायी खडावा गर्जती ।। तुका म्हणे दिगंबर । तया माझा नमस्कार ।। नमन माझे गुरुराय । महाराजा दत्तात्रया ।। तुझी अवधूत मूर्ती । […]

।। श्रीपंत महाराज बाळेकुंद्रीकर ||

गुरुतत्त्व मासिकाचा ऑक्टोबर महिन्याचा अंक हा सद्गुरु श्री पंत महाराज बाळेकुंद्रीकर यांच्या जीवनचरीत्रावर आहे. महाराजांचे जीवन हे अलौकीक आहे. आपल्याला वाचनातुन लक्षात येईलच. गुरुतत्त्वाचे हे ३० वे पूष्प महाराजांच्या चरणी समर्पीत करीत आहे. श्रीपंत महाराज बाळेकुंद्रीकर यांचे व्यावहारिक नाव दत्तोपंत होते. वडिलांचे नाव रामचंद्रपंत व मातोश्रींचे गोदाक्का उर्फ सीताबाई. श्री पंतमहाराजांचा जन्म श्रावण वद्य ८ शके […]

1 53 54 55 56 57 361
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..