‘नुक्कड’ची पस्तीस वर्षे
ही सारी पात्रं रसरशीत जिंवतपणा काय असतो हे दाखवणारी होती. कितीही अडचण असो, एकमेकाच्या सहाय्याला धावणारी, दुसऱ्याच्या सुखात आपलं दुःख विसरुन सहभागी होणारी, एकमेकांच्या दुःखात मात्र जवळ करणारी ही सारी नुक्कड मंडळी. याच्या टायटल साँग मधेच एक वाक्य होतं..’अजब तमाशा है ये नगरी, दुख मे हसते गाते है..अपने बर्बादीका यारो ये तो जश्न मनाते है..’ बस्स..यातच नुक्कडचे सार आहे. […]