मोक्षदायी जलधारा
सरिता ही एक पुण्यप्रदा अखंडित समांतर किनारा ध्यास सागरी समर्पणाचा मोक्षदायीनी ती जलधारा… झुळझुळते संथ अविरत प्रवाह निश्चिंती वाहणारा घेते कवेत, सुखदुःखांना पापक्षालनी ती जलधारा… तमा न पर्वा तिला कशाची फुलवीते, दुतर्फा वसुंधरा नदिकाठ तो सर्वांगी सुंदर राऊळमंदिर गोपुर गाभारा… अध्यात्मी,भक्तीभावरंगला श्रध्येय, मुक्ती गंगाकिनारा… भगीरथाच्या गंगेचे गंगोदक जन्मी आत्मशांतीचा निवारा… –वि.ग.सातपुते .( भावकवी ) 9766544908 रचना […]