नवीन लेखन...

दोन मृत्यू: एक व्यक्तीचा, एक हुद्याचा

बड्या धेंड्याचा देहान्त जाहला, राजकारणी खुर्च्याचा त्राता निवर्तला, जनसागर अवघा शोकसागरात बुडाला अश्रूंचा (कोरड्या) अन् पूर लोटला का कोण जाणे कुणास कसला पत्ताच नव्हता शोक कशाला? शोकग्रस्त जीवांनी गच्च भरले तरीही राजमहाल अपुरे पडले हार वाहिले, पुष्पचक्र अर्पिले तरी बरेच काहीसे अजूनी उरले एकाकी तू असा निजलास का रे कुणी न तुजला वारस का रे शोक […]

सत्य शाश्वताचे

सांज क्षितीजी थबकता रंगले आभाळ भावनांचे शिंपण, अंतरी अमृताचे मनी भास ते अमरत्वाचे… उजळलेली तिन्हीसांजा आविष्कार, कृतार्थतेचे जरी ही गात्रे पांगुळलेली शांत मनात भाव मुक्तीचे… जीव ! स्मृतीत गुंतलेला नाद अंतरी टाळमृदुंगाचे मन, सारे विठ्ठल विठ्ठल संकीर्तनी सत्य शाश्वताचे… यावीण दूजे सुख कोणते अहोभाग्य जन्मोजन्मिचे तोच सावळा एक कृपाळू अंतरंगी सुर मुग्ध पावरीचे… –वि.ग.सातपुते (भावकवी ) […]

निमित्त… तुकाराम !

अनघा प्रकाशन दिवाळी अंक २०१६ मध्ये प्रा. नीतिन आरेकर यांनी लिहिलेला हा लेख श्रेष्ठ दर्जाचं साहित्य हे प्रत्येक काळातील वाचकासमोर एक आव्हान असतं. कारण ते कालसापेक्ष असतं आणि तितकंच कालातीतही असतं. ते साहित्य वाचकाच्या कुवतीनुसार त्याला समाधान देत असतं. तो वाचक, त्या साहित्याची, त्याला सापडलेल्या वा त्याला आधारासाठी उपलब्ध असलेल्या निकर्षांच्या आधारावर समीक्षा करत असतो. तुकारामांचं […]

पंडितांचा बटाटावडा

एकेका पदार्थाचा काय महिमा असतो नाही? पुरणपोळी, मोदक, श्रीखंड, बासुंदी, मणगणं…जाऊदे, थांबतो इथेच. विचारानेही त्रास होतो हो उगाच. आता इथे मी मला आवडणारे पदार्थ घेतलेयत. दुसरं कुणी त्याच्या आवडीच्या पदार्थांची यादी सांगेल. व्यक्ती तितक्या प्रकृ… आवडी. प्रत्येक प्रांतातील नागरिकांना तिथल्या परंपरागत पदार्थांचा मनापासून अभिमान असतो, आणि आपल्याकडे आलेल्या परप्रांतातील पाहुण्यांना हे पदार्थ ते आग्रहाने खाऊ घालतात. […]

बहुआयामी व्यक्तिमत्व वीर सावरकर – १ – बालपणीचे सावरकर

आपल्या दुर्दैवाने आजवर आपल्याला सावरकरांबद्दल पाठ्य पुस्तकातून फक्त दीड पान माहिती दिली गेली. त्यांच, लंडन मधील कार्य,जगप्रसिद्ध बोटीतील उडी,आणि अंदमानातील दोन काळ्या पाण्याच्या शिक्षा. पुस्तकातील सावरकर एव्हढ्यावरच  जाणूनबुजून संपवले गेले. गेली ७० वर्षे सावरकरांवर जाणूनबुजून अन्याय केला गेला. केवळ अन्यायच नाही तर बदनामी व उपेक्षा  केली आहे.सावरकर हे केवळ क्रांतिकारक,द्रष्टे, समाजसुधारक किंवा भाषासुधारक नव्हते.तर त्यांच्या व्यक्तिमत्वाचे अनेक पैलू होते.त्यातील काही पैलू माझ्या लिखाणातून  क्रमिक लेखात  मांडण्याचा प्रयत्न करणार आहे कारण पुढील पिढीला व ज्यांना सावरकर आणखी समजून घ्यावसे वाटतात  त्यांच्यासाठी  मी हा अल्पसा प्रयत्न करत आहे,तरी तुम्हाला लिखाण आवडेल अशी मी आशा करतो. […]

एका कुटुंबाची गोष्ट – भाग १ (आठवणींची मिसळ २७)

अण्णांच्याबरोबर पाच नंबरचा भाऊ (चंदू) अंधेरीला रहायला आला. पहिल्या पाच भावात केवळ तोच मॕट्रीक पास झाला. तो नोकरीच्या शोधात होता. त्यावेळी त्याच्या एका मित्राला दोन नोकऱ्यांचे कॉल आले. एक रिझर्व्ह बँकेतून आणि एक खाजगी कंपनीमधून. मित्राने रिझर्व्ह बँकेची नोकरी स्वीकारली. दोघांचे आडनांव एकच होते. आद्याक्षरे मित्राची जी.एन. आणि ह्याची सी.एन. होती. त्यांचे कॉल लेटर घेऊन हा खाजगी कंपनीत गेला आणि त्याला ती नोकरी मिळाली. […]

सुट्टी

सुट्टीचं नाव निघालं की छोटयांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांच्याच चेहऱ्यावर आनंदाचे भाव उमटतात. सुट्टी म्हणजे आराम, सुट्टी म्हणजे रोजच्या धावपळीपासून सुटका, सुट्टी म्हणजे विरंगुळा ही समीकरणं सर्वांच्याच मनात रुजलेली असतात. रोजची कामे उरकत असताना देखील सगळ्यांच्या नजरा खिळलेल्या असतात सुट्टीच्या तारखेकडे. आठवडयात शनिवार रविवारच्या मध्ये एखाद्या आडवारी सुट्टी आली की तो आठवडा मजेत जातो. आणि शनिवार रविवारला लागून […]

सांत्वन

सांगा, सांगा कुठला देवधर्म आता सांगा कुठले सत्य – असत्य आता..।। कुणी सांगावे, ते ऐकावे देवकृपे ते घडते सारे डोळी दिसले तेच पाहिले सांगा काय ज्ञात – अज्ञात आता….। रामकृष्णही जन्मले जगती देवत्वाची ती साक्ष जगती निधर्माचेच ते रक्षणकर्ते सांगा कुणी पाहिला देव तो त्राता….। कुठली प्रीती, कुठली भक्ती सुखसागरी मस्त धुंदित जगावे श्वासात गंधतो स्वार्थभोग […]

गोष्ट त्या दोघांची

गिरिजाआत्या अणि तिचे यजमान रत्नाकर. आम्ही त्यांना काकाच म्हणायचो. दोघांचा संसार तसा वाढलेल्या वयावरच सुरू झाला. रत्नाकर आपल्या लग्नाचं वय उलटुन गेलेल्या बहिणीसाठी थांबून राहिले होते आणि गिरीजाआत्याचं लग्न जुळत नव्हतं म्हणून ती बिनलग्नाची राहिली होती. गंमत म्हणजे काही वर्षांपूर्वी हे प्रपोजल दोघांच्याही समोर आलं होतं. परंतू प्रत्येक गोष्ट घडण्याची नियतीने एक वेळ निश्चित केलेली असते. […]

सांज रेंगाळलेली

असा एकटाच जीव श्रमलेलेला असह्य वेदनां श्वास कोंडलेला अंतरी कोलाहल अश्रु ओघळलेला उद्वेग भावनांचा विचार बावरलेला मन दिशाहीन आव्हान विवेकाला कसे सावरावे अशांत मनाला भौतिक सुखाचीच आसक्ती जीवाला निर्मळ सुखसौख्यदा त्यजीता षडरिपुला सांज रेंगाळलेली माहोल गहिवरलेला अंती लोचनी सारा गोतावळा…. –वि.ग.सातपुते. (भावकवी) 9766544908 रचना क्र. १९९ १४/८/२०२२

1 57 58 59 60 61 361
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..