सुरेल आवाज आणि सहज अभिनय
आपल्या सुमधुर गळ्याने आणि तितक्याच सहजसुंदर अभिनयाने प्रेक्षकांची वाहव्वा मिळवून ठाण्याचे नाव संगीत रंगभूमीच्या प्रवाहात उजळवणारी अभिनेत्री म्हणजे मधुवंती दांडेकर. पुण्याला सहस्रबुद्धेंच्या घरी जन्मलेल्या मधुवंतीला गायनाचा वारसा मिळाला तो आई मनोरमाबाई सहस्रबुद्धे यांच्याकडून. आईच्या गळ्यातले गाणे लेकीच्या गळ्यात निसर्गदत्तपणे आले आणि मराठी नाट्यसंगीताच्या मैफिलीत एक कसदार सूर दाखल झाला. वयाच्या ९ व्या वर्षांपासून मधुवंतीचे शास्त्रीय संगीताचे […]