नवीन लेखन...

रफी नावाचं दैवत

डिस्क्लेमर- मी आधीच सांगतो की किशोरदांचा जबरदस्त फॅन आहे. पण… रफी आपलं दैवत आहे. कळायलं लागलं तेंव्हापासून या आवाजाने जादू केली आहे. आमच्या लहानपणी एफ एम नव्हते. पण आमची सांगली आकाशवाणी होती..आजही आहे. त्यावर सकाळी भजन सदृश्य गाणी लागायची. त्यात बऱ्याचवेळा ‘शोधीशी मानवा’ किंवा ‘प्रभु तू दयाळू’ नेहमी लागायचे. त्यांच्या त्या भारदस्त आवाजात त्या कोवळ्या मनातही […]

प्रेम

भारतात प्रेमकथा फक्त त्यागाच्याच ऐकायला मिळतात, किंबहुना प्रेम म्हणजे त्याग, दुःख त्रास हे समिकरण इतके जोडले गेले आहे की त्या त्यागाने प्रेमाला बदनाम केले आहे. रामाची सीता, अहिल्या, लोपामुद्रा पासून ते थेट मुमताज महल पर्यंत सगळ्या कथा फक्त त्रास त्रास आणि त्रासाच्याच आहेत. खरंतर प्रेम हे जगणं आहे, प्रेमात आनंद आहे चैतन्य आहे पण या वेड्या त्यागाने प्रेमातली प्रेरणाच संपवून टाकली आहे. […]

जीवन

विसरुनिया अस्तित्वाला निसर्गात एकरूप व्हावे क्षणक्षण प्रगाढ़ शांततेचा एकांती आत्ममुख व्हावे…. शमता अशांत कोलाहल हळूच मागे वळूनी पहावे शिशुशैवव, पौगंड यौवन पुन:, पुनः,पुनः आठवावे…. वास्तव, हे भाग्य भाळीचे ते, वात्सल्यप्रेम आठवावे व्याकुळ उर, भरूनी येता मौनी अश्रुंना प्राशित रहावे…. जे लाभले ते दान प्राक्तनी अंतर्मुख ! सदा होत रहावे सुख,दुःख, संवेदनां, चिंता रेतीवरच्याच, रेषा समजावे…. वास्तवता […]

कशासाठी पोटासाठी!

‘कॉर्निश ‘ हा शब्द इथे येईपर्यंत माझ्या शब्दकोषात आलाच नव्हता. इंग्रजी/फ्रेंच भाषेतला ‘डोंगराच्या जवळून जाणारा रस्ता ‘ हा अर्थ इथे अजिबात लागू होत नाही, पण अरबी भाषेप्रमाणे जमिनीत आतपर्यंत घुसलेला समुद्राचा भाग हाच अर्थ इथेतरी जास्त योग्य वाटतो. विमानातून खाली दुबईकडे झेप घेतानाच दिव्यांच्या रेखीव चमकणाऱ्या रेघेच्या रूपात ह्या कॉर्निशची पहिली सलामी मिळते. […]

सुटका

राबली होती ती – आयुष्यभर, आईबापाघरी आणि – नंतर सासरीही . जणू आयुष्यच तिचं – आजवर, नव्हतं स्वतःसाठी – जराही. आठवत नव्हतं – किंचितही तिला, कधी केल्याची कुणी – विचारपूस. “दे ग थोडा आरामही – जीवाला,” “मरमरून नको त्याला – जाळूस.” जीवनात नव्हती कधी – कसलीच हौसमौज, भावनाहिन शरीर मात्र – लागायचं रोजच्या रोज. कुरतडत ठसठसत, […]

मजुरांचा बाजार (आठवणींची मिसळ २५)

मी सकाळी फिरायला जातो, तिथे वाटेत एक नाका लागतो. मी फिरून परतत असतांना तिथे रोजंदारीवर काम करणारे अनेक स्त्री-पुरूष बसलेले असतात. ते गटागटाने बसतात. त्यांचा कलकलाट चालू असतो. रस्ता अडवून मात्र बसत नाहीत. त्या दिवशी त्यांना कुठे काम करायला जायचय हे त्यांना ठाऊक नसतं. पण मनाशी आशा बाळगून ते मजूर तिथे बसलेले असतात. […]

खुर्ची

खुर्चीसाठी पोकळ बाता खुर्ची राजकीय ‘खल ‘बत्ता खुर्ची आहे माझी माता खुर्चीच सर्वस्व आता ॥ १ ॥ खुर्ची आहे तिखट मिरची आली जवळ तरीही दूरची खुर्चीसाठीच प्रवास माझा खुर्ची सोय माझ्या पोटाची ॥ २ ॥ खुर्चीसाठी हो पुण्याई गाठी खुर्ची माझी मी खुर्चीसाठी जरी प्रवेशली माझी साठी खुर्ची स्पर्धेत मी ना पाठी ॥ ३ ॥ दिल्यात […]

उगाच काहीतरी – १८ (जाहिराती)

बाकी अशा इतर बऱ्याच जाहिराती आहेत जसे चित्रपटाच्या वेब सिरीज च्या आणि हो आजकाल न्यूज चॅनलचे पण होर्डिंग लागलेले असतात. मंत्र्यांच्या आणि त्यांच्या चेल्यांच्या वाढदिवसाचे बॅनर्स, वगैरे वगैरे वगैरे. पण एक मात्र निश्चित आहे की जाहिराती शिवाय धंदा होणं शक्य नाही. […]

समीक्षक, अभ्यासक आणि विचारवंत

पुलंची मुलाखत घेण्यासाठी एकदा एक स्त्री पत्रकार आली होती. मुलाखत अगदी छान हसत खेळत झाली आणि आता आपल्याविषयी पेपरात काही बरं छापून येईल या कल्पनेने पुलंही पुलकित झाले. काही दिवसांनी त्या बाईंची समिक्षा पेपरात छापून आली, “पुलं स्वतःस पुरोगामी म्हणत असले तरीही त्यांचे पाय मातीचेच आहेत” पुलं बुचकळ्यात पडले, बाईंनी हे असं लिहिण्याचं कारण काय असावं? […]

सत्य दृष्टांत

सत्य, दृष्टांत हरिहराचा शब्द निःशब्द भावनांचे लोचनीच फक्त साठवावे रूप, अतर्क्य नियंत्याचे….. गवाक्षी कवडसे नारायणी तिमिरीही भाव प्रसन्नतेचे उघड़ता कवाड़े अंत:चक्षु ओंजळी शब्द सरस्वतीचे द्वैत अद्वैताचे मिलन सुंदर तृप्ततादात्म्य मुग्ध पावरीचे स्पंदनी झरावी पुण्यपुण्यदा भाग्य, मंत्रमुग्धी कृतार्थतेचे…. मीत्व व्यर्थची सोडूनी द्यावे अर्थ ! उमजावे सात्विकतेचे निर्मोही मैत्रतत्व उरी रुजावे स्मरावे नित्य नाम भगवंताचे…. –वि.ग.सातपुते.( भावकवी ) […]

1 59 60 61 62 63 361
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..