नवीन लेखन...

हेचि दान देगा देवाsss

अनघा प्रकाशन दिवाळी अंक २०१६ मध्ये रामकृष्ण अभ्यंकर यांनी लिहिलेला हा लेख संत पुरुष म्हणजे ईशतत्त्वाचे वाटाडे. जन्मभर स्वतः वारेमाप कष्ट करून सतत त्यांनी जगाचेच हित चिंतिले आहे. ‘चिंता करीतो विश्वाचि ऽऽ’ या वचनातून समर्थ रामदास स्वामींनी ‘कल्याण करी रामराया ऽऽ’ या शब्दांतून समाजाबद्दल ईश्वरीशक्तीकडे अशीच करुणा भाकली आहे. जीवनाच्या अवघ्या जेमतेम दोन दशकाच्या उण्यापुऱ्या काळात […]

“पाणवठा” जिथे माणुसकी सोबत प्राणुसकी नांदते.

सावली गौरव सोहळ्याचा दिवस हा गणराज आणि डॉक्टर अर्चना यांच्या घरचा सोहळा असल्यासारखा वाटत होता. अर्चनाजी म्हणाल्या सुद्धा, आर्थिक विवंचना रोजची असतेच पण या दिवशी मात्र आम्ही आणि आमचा संपूर्ण पाणवठा परिवार एका वेगळ्याच आनंदात विहार करत असतो. […]

निरिच्छ होऊन जगण्यात सर्वोच्च आनंद

आयुष्यभर राजयोगी होऊन रहाणे फार अवघड गोष्ट आहे. आयुष्यात व्यवहारही आवश्यकच आहे.पण त्या व्यवहारांच्या किंमती पलिकडे जाऊन जगाला आपले देणे देता येणे हे महद्भाग्य फार थोड्याश्याच भाग्यवान व्यक्तींना लाभते. […]

माझा बालवाडीत प्रवेश

छे हो मला बालवाडी हे माहित नव्हते. पाच वर्षे पूर्ण झाली की थेट पहिल्या इयत्तेत. आणि पु. ल. यांच्या भाषेतील पालक केजी वगैरे काही नव्हते. चार मैत्रीणीसोबत शाळेत जायचे आणि यायचे. रडले नाही कधीच. पण नोकरी करत असताना मात्र बालवाडीत बसण्याची संधी मिळाली होती ती अशी. माझी नगर परिषदेची शाळा. त्यामुळे पहिल्या इयत्तेत मुलांना प्रवेश मिळणे […]

मन श्रावण

सखये सृष्टिलाही स्वप्न तुझे ऋतुं ऋतुंतूनी तूं झुळ झुळते…. ऋतुं रंगली, तुं स्वरूप सुंदरी चैतन्याला मनमुक्त उधळीते…. कुसुम सुमनी, तुझेच दरवळ कांचन किरणातुनी तू स्पर्शते…. तव अधरीचे, हास्य श्रावणी मन मनांतर, मोहरुनी जाते…. तूच अंतरी सप्तरंगले इंद्रधनु आत्म सुखाची प्रचिती असते… तूच श्रावणातील श्रावणधारा अव्यक्तालाही चिंब भिजविते…. क्षण हेच खरे अवीट ब्रह्मानंदी निर्झरी, संथ गुणगुण तोषविते…. […]

पडद्यामागचे ठाणेकर

नाटक हा एक सांघिक कलाप्रकार आहे. लेखक, दिग्दर्शक, कलाकार यांचा मेळ तर जमून यावा लागतोच, पण त्यांना नेपथ्य, प्रकाशयोजना, पार्श्वसंगीत, वेशभूषा, रंगभूषा याची साथही मिळावी लागते. मात्र या सगळ्या तांत्रिक बाजू सांभाळणारे रंगकर्मी नेहमी पडद्यामागे राहतात. त्यांचे चेहरे फार क्वचित प्रेक्षकांना दिसतात, पण त्यांचे कला कौशल्य, तंत्रावरील हुकूमत नाटकाची परिणामकारकता वाढवण्यासाठी निश्चित महत्त्वाची असते. अशाच काही […]

श्री. जगन्नाथ पाठक ।। सद्गुरुमाऊली जगन्मित्र ।।

सप्टेंबर २०१९ महिन्याचा गुरुतत्त्व विशेषांक दत्तमहाराजांची कर्मभूमी असलेल्या श्री क्षेत्र गाणगापूर स्थित जय गुरुदेव आश्रम ट्रस्टचे संस्थापक ब्रह्मलीन परमपूज्य जगन्नाथ चिंतामण पाठक गुरुजी यांच्या जीवनावर आधारित आहे. “भक्तकामकल्पदुम” श्रीमद्गुरुचारत्र” हा पाचवा वेद म्हणून मानल्या गेलेल्या परमाण प्रासादिक अलैकिक ग्रंथाची इ. स. १९५४ सालापासून गेली ६० वर्षे सातत्याने शेकड पारायणे करुन त्याद्वारे “ग्रंथ हेच गुरु” हे तत्त्व […]

प्रेम पुरेसं की तडजोड आणि विश्वास हवा ????

अशा प्रकारच्या वाक्यांची उधळण दोघंही एकमेकांवर करत असतात. आता ही वाक्य प्रत्येकवेळी असमंजसपणे म्हटली जातात असं मी मुळीच म्हणणार नाही. आपल्याला समजून घेणारा जोडीदार किंवा जोडीदारीण मिळालीय या घट्ट समजुतीचा शब्दातून व्यक्त होणारा तो परिपाक असतो. […]

मिशन इंपॉसिबल

तगडा हँडसम टॉम क्रुज तसा आधीच टॉप गन पासून ॲ‍क्शन हिरो म्हणून लोकांना खूप आधीपासूनच आवडला होता. पण MI ने जगभर इतकी जबरदस्त कमाई केली की स्वतः टॉमने MI Franchise चे हक्क घेत 1996 ते 2018 या 22 वर्षात MI-2, MI-3, MI-Ghost Protocol, MI-Rogue Nation, MI-Fallout असे तब्बल सहा सिनेमे या फ्रँचाइज अंतर्गत काढलेत. […]

नाईलचा बाहू

नाईल नदीच्या खुफू ‘बाहू’नं गिझाच्या पठारावरील पिरॅमिडच्या बांधणीत मोठी भूमिका बजावली असली तरी, या अगोदरच नाईल नदीची पातळी खाली जायला सुरुवात झाली असल्याचं या संशोधकांना आढळलं. कारण आफ्रिकेतला अतिदमट हवामानाचा काळ संपला होता. नाईल नदीला पूर्व आफ्रिकेतून होणारा पाणीपुरवठा रोडावला होता. मात्र नाईल नदीची पातळी आता जरी घटू लागली असली तरीही, खुफू शाखेला पाणी पुरवण्याइतकी ती पुरेशी होती. पिरॅमिड बांधली गेली त्या शतकात, खुफू शाखेची पातळी एकेकाळच्या कमाल पातळीच्या तुलनेत चाळीस टक्क्यांवर स्थिरावली होती. […]

1 60 61 62 63 64 361
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..