नवीन लेखन...

हरलेल्याचे बक्षिस

सध्या अनेक क्षेत्रात पारगंत होण्यासाठी छंदवर्ग आहेत. आईबाबा दोघेही नोकरी करतात. भरपूर पैसा आहे आणि एक किंवा दोन मुलं. त्यामुळे आपल्या मुलांनी खूप शिकावे. म्हणून मुलगा जे करायचे म्हणतो ते करु देतात. पण ध्येय कोणते हे दोघांनाही माहिती नाही. ध्येयाच्या प्रती एक पाऊल पुढे टाकले तरी ती प्रगती असते. […]

पावित्र्य

सांगु कसे मनांतरीचे अव्यक्त, ते गुज मी तुझ्या साऱ्या आठवांचे क्षण स्मरतो सदैव मी श्वासात या भास तुझा स्वप्नातही जागतो मी छळते मज रात्र सारी विरघळतो तुझ्यात मी जाहलाच सराव आता तुजवीणही जगतो मी घायाळ अंतरीचे उसासे तवस्मृतीत, सावरतो मी नि:शब्दी जरी भावप्रीती जाणतो मौनी पावित्र्य मी — वि.ग.सातपुते ( भावकवी ) 9766544908 रचना क्र.१७५ २१ […]

ठाणे शहराच्या सांस्कृतिक चळवळीतील माझे योगदान

गवयाचे पोर सुरातच गायचे या उक्तीनुसार मला उपजतच संगीताचा कान आणि गळा लाभला होता. मी छोटा शाहीर म्हणून समरगीते, लोकगीते गाऊ लागलो आणि रंगमंचावर पहिले पाऊल 1961-62 साली टाकले. आज 53 वर्षे मी रंगमंचावर गायक, नट, दिग्दर्शक, नेपथ्यकार, निर्माता, प्रकाशयोजनाकार म्हणून काम करतो आहे. […]

वाढदिवस !

लहानपणी शाळेत /गल्लीत कोणाला माझा वाढदिवस माहीत असण्याचे कारण नव्हते.नवीन कपडे वगैरे नसायचे. गोड म्हणून क्वचित शिरा किंवा केळीचे शिकरण ! आई औक्षण करायची. आई- आजींना नमस्कार करायचा. वडील बहुदा परगावी असत. एकुणातच या दिवसाची फार अपूर्वाई नसे आणि आतुरतेने वाट पाहणेही नसे. […]

बाबा

लग्न झालं अन् – ती सासरी निघाली, त्याची मात्र खूप – घालमेल होऊ लागली. काय होतंय नेमकं – त्याला काही कळेना, अस्वस्थपणा जीवाचा – कमी कुठे होईना. खूप वर्षांपूर्वीची ती – आठवण जागी झाली, तशीच एक बारीक कळ – आता हृदयातून गेली. आतली तडफड चेहेऱ्यावर – उमटत नव्हती काही, दुराव्याचे कढ मात्र – फुटत होते तरीही. […]

बलात्कार

घरात बंदिस्त केल्यावर मुलीला फार मोठा मानसिक धक्का बसला होता. त्यामुळे ती डिप्रेशनमधे गेली. तिला आवश्यक आणि चालू असलेली औषधे इतकी तीव्र होती की मुलगी जागी असतानाही अर्धवट झोपेत असल्यासारखी असायची. आणि ती या धक्यातून बाहेर येणे जवळ जवळ अशक्य होते. […]

रेल्वेच्या डब्यांतील स्वच्छतागृहं

प्रवासी रेल्वेमधील प्रत्येक डब्याला दोन्ही बाजूंना दोन अशी समोरासमोर एकूण चार स्वच्छतागृहे असतात. ती वेळोवेळी स्वच्छ ठेवणं, त्यांत व्यवस्थित पाणी पुरवठा करणं व दिवाबत्तीची सोय करणं, कडी कोयंडे तपासून दुरुस्त करून घेणं, अशा अनेक गोष्टींकडे लक्ष द्यावं लागतं; पण या महत्त्वाच्या कामात बऱ्याच वेळा निष्काळजीपणा आढळून येतो. त्यामुळे डब्यात शिरताना दाराजवळच येणारी तसंच प्लॅटफॉर्मवर येणारी दुर्गंधी […]

बाप आणि लेक

आपल्याला पहिला मुलगाच हवा, मुलगा म्हणजे कुळाचा उध्दारकर्ता , मुलगी काय परक्याचं धन असले विचार तर आम्हा दोघांच्याही मनाला कधी शिवले नाहीत. मुलीच्या जन्मानंतर आठ वर्षांनी आमच्या घरात एका गोड लेकाचा जन्म झाला, ही गोष्ट वेगळी. […]

माझे शिक्षक भाग – ३. (आठवणींची मिसळ १७)

आम्ही होतो, तो मराठीचा सुवर्णकाळ म्हटला पाहिजे. मला वाटतं त्यावेळचे शिक्षक हायस्कूल सोडून गेल्यावर आठवीपासून एक एक वर्ग बंद करायला सुरूवात झाली.
ह्यामुळे आम्हा त्यावेळच्या विद्यार्थ्यांना आणि सरांना एकमेकांबद्दल आपुलकी कायम राहिली तरी एम. ए. हायस्कूलबद्दल ती आपुलकी कधी वाटली नाही. […]

उपचार सारे

हात अनेक भवती एक काळजाला भिडत नाही नाती झाली उदंड, तरी जिवाभावाची साथ नाही गर्दीचे संमेलन केवढे, पण कोण कुणाला सामील नाही भेटीगाठींचा वर्षाव सारा, आतड्याला कुणाच्या पीळ नाही विलगणारे ओठ अगणित. पण हास्याची लकेर नाही बिलगणाऱ्या शरीरांचा कधी अंत:करणाला स्पर्श नाही शब्दांचा पाऊस भरपूर पण भिजलेला एकही नाही विचारांचा वर्षाव तरीही मनाला स्पर्शून नाही. आण्यांचे […]

1 75 76 77 78 79 361
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..