नवीन लेखन...

संवाद

संवाद हा नात्यातला श्वास आहे. जर हा श्वास थांबला तर नातं ही थांबतं. नवजात शिशु जेव्हा जेव्हा जन्म घेतो त्या दिवसापासून आई त्याच्या सोबत संवाद साधू लागते. या संवादामुळे त्याला या जगातील नाती, वस्तु, पदार्थ…. यांचे ज्ञान होऊ लागते. नात्यांशिवाय मनुष्य म्हणजे पानगळती झालेलं जीर्ण झाड! ज्यावर पक्षीदेखील आपलं घरटं बांधत नाहीत. ही पानगळती टाळण्यासाठी संवाद साधा व नात्यांना टवटवीत ठेवा. […]

सिंहगड ते रायगड – ट्रेक – भाग २

मला ही वाट उतरताना तोल जाऊन पडू अशी मनात थोडी भीती वाटत होती, पण प्रत्यक्ष वाट उतरताना फार त्रास झाला नाही. सर्वजण सुरक्षित पणे वाट उतरले. ती वाट उतरताच आम्ही आता गडा पासुन दूर सपाट जागी आलो.मागे वळून पाहिले तर  राजगड मोठ्या  दिमाखात चमकत होता.त्याच्या कडे पाहताना मन भरून येत होते. […]

उणा आनंद…….

टाळ्यांच्या प्रचंड कडकडाटात रंगमंचावरून मानसच्या नावाची घोषणा झाली, “आणि आपल्या राज्यस्तरीय काव्यस्पर्धेचे, पहिल्या क्रमांकाचे मानकरी आहेत……….” संपूर्ण सभागृह त्याच्या रंगमंचाकडे येण्याची प्रतीक्षा करत होतं. उत्तेजनार्थ क्रमांकापासून तिसऱ्या दुसऱ्या क्रमांकाच्या घोषणेपर्यंत तो ही टाळ्यांनी विजेत्या स्पर्धकांचं कौतुक करत होता, आणि मनातून निराशही होत होता. प्रचंड रहदारीमधून बसचा दीड पावणेदोन तासाचा प्रवास करून आला होता तो बक्षीस समारंभाला. […]

“जोखीम”

आज संयोगिताची एका डोळा हसू आणि एका डोळा आसू अशी अवस्था होती. आज तिच्या लाडक्या एकुलत्या एक लेकीचं, मनूचं म्हणजेच मनस्वी सावंतचं लग्न होतं. मोठी मोठी मंडळी आली होती लग्नाला. लग्न पण मोठ्या पंचतारांकित हॉटेलमध्ये होतं. तिची मनस्वी आज सावंत नाव मागे सोडून सौ. मनस्वी शार्दुल भोसले होणार होती आणि त्याचा संयोगिताला खूप अभिमान होता. […]

जोडवी – भाग १

विजय हातातील पेपर सोफ्यावर टाकत उठला आणि दरवाज्याच्या दिशेने चालू लागला त्याने हळूच दरवाजा उघडला तर दरवाजात एक सुंदर स्त्री उभी होती… […]

आठवणी गावाकडच्या..।

ग्रामीण भागामध्ये दिवाळी हा सण अतिशय महत्त्वाचा असा आहे. वर्षातील बारा महिन्यांपैकी हा महत्वपूर्ण दिवाळी सण या सणाला गोड गोड खाण्याची मज्जा व खारट चिवडा. प्रत्येकाच्या जिभेला चव देणारा हा चिवडा कायम आठवणीत राहणारा असा आहे. शहरातील दिवाळीपेक्षा ग्रामीण भागातील दिवाळी अतिशय मजेशीर अशी असते. ग्रामीण भागातील नवीन लग्न झालेल्या मुली नागपंचमी गवर गणपती व दिवाळी या सणावर खास करून माहेरी येत असतात. नवीन लग्न झालेल्या मुली यांचा विषय अतिशय रंगेल असा असतो. कार्तिक महिन्यातील दिवाळी दिवाळ काढून गेली तरी आठवण मात्र कायम प्रत्येकाच्या स्मरणात राहते हे वेगळे सांगण्याची गरज नाही. […]

भोजनशास्त्र

प्राचीन काळात भारतवर्षात पाकशास्त्रसुद्धा अत्यंत समृद्ध होते. अनेकविध शेकडोंच्या संख्येने असलेले पदार्थ, खाण्याच्या पद्धती व भोजनविधी यांनी प्राचीन पाकशास्त्र संपन्न आहे.  भोजन शुद्ध, स्वादिष्ट व हितकर होण्यासाठी ज्याप्रमाणे पदार्थांच्या गुणवत्तेवर लक्ष द्यावे लागते, तेवढेच महत्त्व भोजनासाठी उपयोगात आणल्या जाणार्या पात्रांबाबत (भांड्यांबाबत) सुद्धा लक्ष द्यावे लागते. […]

रूप बिलोरी

असते कां खरे? दर्पणातले रूप बिलोरी झांकता अंतरी मलाच माझे कळत नाही मी खराखुरा कां? खरे प्रतिबिंब बिलोरी हा संभ्रम मनीचा अजुनही दूर होत नाही हसवे, फसवे, नाटकी सत्यरुप मनीचे तो आरसा बिलोरी कधीच दाखवित नाही अदृश्य वास्तवी अंतरीचेच प्रतिबिंब खरे आरश्यातले प्रसन्न रूप बेगडी सत्य नाही निर्मळ स्पर्श मानवतेचा हीच खरी सुंदरता जगी याविण दूजे […]

आमूलाग्र बदल (Paradigm Shift)

बदल नेहमी आपल्या भल्यासाठीच होत असतो म्हणून वर्तमानावर नजर ठेवून बदलण्याची तयारी सर्वांनी (व्यावसायिकांनी आणि कर्मचाऱ्यांनीही) ठेवावी. […]

ॲरिस्टोटलचं थडगं

इतिहासाचा शोध घेताना त्यासंबंधीच्या प्रत्येक वस्तूला महत्त्व द्यावं लागतं. कारण, ती वस्तू म्हणजे भूतकाळ आणि भविष्यकाळ यांना जोडणारा दुवा असते. एका संशोधकाला, चोवीस शतकांपूर्वीच्या इतिहासाशी नातं सांगणारा एक दुवा सापडला आहे. हा दुवा म्हणजे चक्क एक थडगं आहे. पण हे थडगं सामान्य व्यक्तीचं नाही. हे थडगं आहे ते पुरातन काळच्या ग्रीक साम्राज्यातल्या ॲथेन्सचा प्रख्यात तत्त्वज्ञ ॲरिस्टोटल याचं! […]

1 6 7 8 9 10 361
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..