नवीन लेखन...

ठाणे नगररत्न पुरस्काराने सुखावले

२०१५ हे वर्ष मला बरेच काही द्यायचे असे ठरवून उजाडले. ‘ठाणे नगर विकास मंच’ ही संस्था दरवर्षी विविध क्षेत्रात काम करणाऱ्या पाच मान्यवरांना ‘ठाणे नगररत्न’ पुरस्काराने सन्मानित करते. ठाणे शहराचे माजी उपमहापौर आणि ठाणे नगर विकास मंचचे अध्यक्ष माननीय श्री. सुभाष काळे यांनी फोन करून त्यांच्या ऑफिसमध्ये बोलावून घेतले. “अनिरुद्धजी, कलाक्षेत्रातील या वर्षीच्या ठाणे नगररत्न पुरस्कारासाठी […]

देवगड हापूस 

मूळ देवगड हापूस आंबा, हे प्रकरण काय आहे, हे ज्याने तो एकदा खाल्लाय त्यालाच कळू शकतं. पुलंनी उगाच नाही त्याला “सगळ्यांचो बापुस” असं म्हटलंय. एकदा का देवगड हापूस मुखात गेला, की इतर सगळे आंबे त्याच्यापुढे अगदी फिके वाटू लागतात. त्याचं रूप, त्याची कांती अगदी वेगळी असते. सुरकुतलेला , थकलेला, मरगळलेला देवगड हापूस असूच शकत नाही. तुकतुकीत […]

रंग अवकाशाचा मुक्तयात्री – अशोक साठे

आमच्या मेंदूच्या एका कप्यात चक्रावर्तासारखा तू का भिरभिरत असतोस? काही निमित्तांनी (आता नाट्यसंमेलन) अंधारानंतर सायक्लोरामावर पडलेल्या लख्ख पहाट प्रकाशासारखा का आठवत राहतोस? जसाच्या तसा! तुझ्याबरोबर घालवलेला प्रत्यक्ष क्षण तळहातावर स्वातीच्या थेंबाचा मोती ठेवावा, तसा मनचक्षूसमोर सजीव होऊन उलगडत राहतोस (हे जरा शब्दबंबाळ वाटतंय ना?) नाटकाची संहिता वाचताना हळूहळू अस्पष्ट, पण मग साकार दिसणाऱ्या पात्रासारखा, प्रसंगासारखा (हे तुला जवळचं वाटेल). […]

गढवालमधील पंचप्रयाग

केदारनाथहून येणारी, निळ्या रंगामुळे खुलणारी, शांत वाहणारी मंदाकिनी तर बद्रीनाथहून आदळत, आपटत खळाळत धावणारी अलकनंदा यांचे संगमस्थान म्हणजे ‘रूद्रप्रयाग’. या स्थानाचे उल्लेख स्कंदपुराण तसेच महाभारतात आले आहेत. श्रीशंकर पार्वतीमातेला सांगतात, “हे देवी, माझे तिसरे निवासस्थान रूद्रालय या नावाने प्रसिद्ध आहे. ते सर्व तीर्थांत उत्तम तीर्थ आहे. या स्थानाच्या स्मरणानेसुद्धा व्यक्ती सर्व पापातून मुक्त होते. […]

भारतमातेच्या वीरांगना – ५७ – मीरा बहन

७ नोव्हेम्बर १९२५ साली त्या भारतात आल्या, त्यांना घ्यायला सरदार वल्लभाई पटेल, महादेव देसाई आणि स्वामी आनंद गेले होते. इथे आल्यावर त्या हिंदी भाषा शिकल्या, भगवद्गीता शिकल्या, आणि गांधीजींच्या आश्रमाची पूर्ण कार्यपद्धती स्वीकारली, मैडलीन च्या मीरा बहन झाल्या, स्वाभाविकच आहे भारताच्या स्वातंत्र्य संग्रामाचासुद्धा त्या हिस्सा बनल्या. तत्पूर्वी १९३१ साली लंडन ला झालेल्या गोलमेज परिषदेच्या त्या हिस्सा बनल्या. १९३१ साली असहकार आंदोलनात त्यांनी सक्रिय सहभाग नोंदवला परिणामी दोन वर्षे सक्त मजुरीची शिक्षा झाली. त्यातून बाहेर आल्यावर त्यांनी भारताची बाजू इतर देशांसमोर मांडायला सुरवात केली. […]

डोळ्यासमोर आई वडिलांची हत्या पाहणारा गीतकार -गुलशन बावरा

गुलशन बावरा यांनी कायम हसती खेळती गाणी लिहिली. पण बालपणाच्या प्रसंगाची व्यथा त्यांना कुठे तरी सलत होती म्हणूनच त्यांनी जंजीर मधले “ बनाके क्यू बिगाडा , बिगाडा रे नासिबा उपरवाले “ हे गाणे लिहिले. त्यांनी अनेक संगीतकाराबरोबर काम केले. पण त्यांचे जास्त  सूर जुळले ते कल्याणजी आनंदजी व आर.डी बर्मन यांच्या बरोबर. त्यांनी जवळ जवळ २४० गाणी लिहिली. त्यांनी हौस म्हणून जवळ जवळ १५ चित्रपटात काम केले.(जंजीर चित्रपटाच्या “दिवाने है दिवानोको न घर चाहिये “ या गाण्यात रस्त्यावर पेटी वाजवताना दिसतात.) […]

ओळख महाराष्ट्रातील जंगलांची : भाग ५ – सदाहरित जंगलातील धन्वंतरी – अर्जुन वृक्ष

हा वृक्ष २५ ते ३० फुट वाढणारा असून तो आकाराने मोठा आहे. उभ्या व लांबट अशा त्याच्या खपल्या पडतात. त्याची पाने ही ऋतूपर्णी, चामड्यासारखी १३ ते २० से.मी. वाटूळकी व देठाकडे निमुळती होणारी असतात. शेंडे पिवळसर असतात. त्याची फळे ही २.५० ते ५ से.मी. लांब चामड्या सारखी जाड पंख, निमुळती व त्यावर आडव्या रेषा व त्याला पंचाकृती आवरण असते. […]

स्वातंत्र्यदिन आणि मोरु

१५ ऑगस्टला सकाळी मोरुचा बाप मोरुला उठवायला आला. “अरे मोरु ऊठ, आज स्वातंत्र्यदिन. बघ सगळीकडे कशी देशभक्तीपर गाणी लागली आहेत. चल लवकर आटपून झेंडावंदनाला जा. स्वातंत्र्यदिन आपण उत्साहाने साजरा करायला हवा.” […]

ध्येयाच्या दिशेने पण धीराने

माझा मामेभाऊ डॉ. प्रद्युम्न करंदीकर याच्यासाठी गझलचा कार्यक्रम केला. आयोजक आणि गायक महेश लिमयेबरोबर वसई येथे भक्तीसंगीताचा कार्यक्रम केला. ‘स्वर – मंच’च्या गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम दरवर्षीप्रमाणे झाला. मुंबई दूरदर्शनसाठीही एक कार्यक्रम केला. पण कार्यक्रमाचा वेग एकदम मंदावला होता. २०१३ वर्षअखेर कार्यक्रमांची संख्या मी फक्त ९६३ पर्यंत वाढवू शकलो. कार्यक्रमाचा वेग मंदावण्याचे अजून एक कारण जानेवारी २०१४ मध्ये […]

दिशादर्शकं

सुरुवातीच्या काळात प्रवाशांकडे प्रवासासाठी कंपासही नव्हतं , त्यावेळी यांना अनेक अडथळे प्रवास करताना घ्यायचे. तेव्हा ते अनेक वेगवेगळ्या प्रकारे साधनांचा योग्य तो उपयोग करून प्रवास करायचे . सुरुवातीला दर्यावर्दी हे तेथील ठिकाणाच्या निसर्गा कसा आहे . त्याचा उपयोग करून तेथील ठिकाण ओळखत असे. दर्यावर्दी प्रवाशांसाठी पहिलं महत्त्वाचा साधन म्हणजे आकाशातील ग्रह , तारे असायचे . ग्रहताऱ्यांच्या खानाखुना वरून ते प्रवास करायचे . आकाशातील गोष्टींचा उपयोग करून पुढील डोंगरदऱ्यातून प्रवास करायचे. त्या ग्रहताऱ्यांच्यावरून तिथे कोणता परिसर आहे . याचा ते योग्यरीत्या अंदाज लावायचे . व त्यांचा प्रवास सुखकर करायचे. […]

1 80 81 82 83 84 361
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..