नवीन लेखन...

श्री स्वामी समर्थ

श्री गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरु देवो महेश्वरा. श्री स्वामी समर्थांमध्ये या तिन्ही रूपांचा समावेश होतो. खरंतर स्वामींकडे तुम्ही ज्या भावनेने पाहता तेच रूप तुम्हाला त्यांच्यात दिसेल म्हणूनच स्वामींच्या काही मठांमध्ये आपल्याला त्यांची स्त्री देवतेच्या रूपातली आदिशक्ती मूर्ती प्रतिमा दृष्टीस पडते. निदान ते रूप पाहून तरी आपण त्या शक्तीचा आदर केला पाहिजे. […]

शिवमहिम्न स्तोत्र – मराठी अर्थासह – भाग १

भाविकांच्या मते, भगवान शंकराचे माहात्म्य व साधेपणा सांगणारे, शिवमहिम्न स्तोत्र हे अत्यंत प्राचीन स्तोत्र आहे. त्याच्या कालासंदर्भत विविध अभ्यासकांनी विविध मते मांडली आहेत. […]

रेल्वे ट्रॅक (लोखंडी सडक)

रेल्वेची चाकं व्यवस्थितपणे, विनासायास फिरत जातील अशा ‘दोन समांतर रेषेत असलेल्या; कठीण, तरीही गुळगुळीत अशा; सलग व लांबच लांब लोखंडी पट्टया’ म्हणजे रेल्वेचा ‘ट्रॅक.’ तो व्यवस्थित व सुरक्षित ठेवण्यासाठी अनेक धोकादायक अडचणींवर मात करावी लागते आणि तो बनविण्यासाठी कल्पनेबाहेर खर्च येतो. आजच्या जमान्यात रेल्वेची बांधणी ही बाब अतिशय सहजपणे गृहीत धरली जाते, त्यामुळे त्याकडे आवर्जून फारसं […]

पहिला भक्षक?

सजीवाच्या शरीराचं स्वरूप, हा प्राणी आजच्या जेलिफिशसारख्या, छत्रीसारखा आकार असणाऱ्या आणि शुंडक धारण करणाऱ्या सागरी प्राण्यांच्या, मेडूसोझोआ या प्रकारचा प्राणी असण्याची शक्यता दिसून आली आहे. याचा शोध लावणाऱ्या संशोधकांनी या सजीवाला ‘ऑरालुमिना अ‍ॅटेनबरोई’ हे जीवशास्त्रीय नाव दिलं आहे. या नावातील पहिला भाग असणारा ‘ऑरालुमिना’ हा लॅटिन शब्द म्हणजे पहाटेची मशाल. जीवसृष्टीच्या उत्क्रांतीच्या पहाटेच्या काळात अस्तित्वात आलेल्या, मशालीसारखा आकार असणाऱ्या या सजीवाला पूरक असं हे नाव आहे. या नावातला ‘अ‍ॅटेनबरोई’ हा दुसरा शब्द प्रख्यात निसर्गअभ्यासक डेव्हिड अ‍ॅटेनबरो यांच्या गौरवार्थ वापरला आहे. […]

गुरूवंदना गायन गृप (आठवणींची मिसळ १४)

माझ्या साडूंनी (कै.रमेश वैद्य) निवृत्तीनंतर एक छान उपक्रम सुरू केला होता. ते स्वतः उत्तम गायक होते. ते गीतकारही होते. त्यांच्या अनेक रचना रेडीओच्या सुगम संगीतात अनेकदा चांगल्या चांगल्या गायक-गायिकांनी गायल्या. गायनावर त्यांचे खूप प्रेम होते. निवृत्तीनंतर ते इच्छूकांना गायन शिकवत असत. पण मी म्हणतो तो उपक्रम आगळावेगळा होता. दर गुरूवारी त्यांच्या घरी गाण्याची एक खास बैठक होई. त्यांत भाग घेणारे बहुतेक सर्वच जण निवृत्त झालेले होते. कांहीनी नोकरी पूर्ण केली होती तर कांही जणांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली होती. पण सर्वांच गायनावर प्रेम होतं. ह्या दोन-अडीच तासांच्या बैठकीत सर्वजण वीस वीस मिनिटे गात असत. जे थोडे कच्चे होते, तेही हळूहळू चांगले गाऊ लागत. कारण इतर सदस्य त्यांना उत्तेजन देत. ह्या बैठकींना त्यांच्या निवृत्तीनंतरच्या जीवनांतखूप महत्त्वाचं स्थान मिळालं त्यांच्या या गृपला अकरा वर्षे पूर्ण झाली तेव्हां सर्वांनी मिळून एक गाण्याचा कार्यक्रमच सादर केला. दोनशेहून अधिक श्रोते त्या कार्यक्रमाला हजर होते. मला त्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणा म्हणून बोलावले होते. काल कांही कागद चाळतांना मी त्या कार्यक्रमाच्या वेळी जे भाषण केले होते ते हाती आले. मी कांही मोठा वक्ता नाही की माझी भाषणे नोंदली जावीत. परंतु निदान तुम्हांला ते सादर करावं असं मनात आलं म्हणून इथे देत आहे. […]

माझं गुपित

काळजाच्या डबीत, मनाच्या कुपीत जपलय् मी माझं इवलसं गुपित ॥ आहे त्याचा तर आनंद आहे नसत्याची नाही उणीव काही आनंदपरिमल दुःखाची मळमळ कुठल्या भासाची, तळमळ न ठेवत जपलय् मी माझं इवलंसं गुपित ॥ १ ॥ चक्रावणाऱ्या या चक्रव्यूहातून गुदमरवणाऱ्या गाढ गर्दीतून विवंचनांच्या वावटळींमधून शहाणपण माझं आटोकाट जपत जपलय् मी माझं इवलंसं गुपित ॥ २ ॥ जीवाचा […]

उगाच काहीतरी – ७ (सर्कल ऑफ मॅरिड लाईफ)

त्या : अहो, हे हॅण्डल (किंवा जे काही इतर असेल ते) खराब झालंय जरा दुरुस्त करून द्या ते : रविवारी करतो. रविवारी….. ते : नाश्ता करून झालं की दुरुस्त करतो. ते : दुपारी दुरुस्त करतो. ते : आता थोडं पडू दे, संध्याकाळी दुरुस्त करतो. ते : उद्या ऑफिस वरून आल्यावर करून देतो. सोमवारी….. ते : रविवारी […]

भारतमातेच्या वीरांगना – ५६ – नेली सेनगुप्ता

१९३३ सालच्या राष्ट्रीय काँग्रेस अधिवेशनाच्या त्या अधक्ष्या होत्या. ब्रिटिश त्यावेळी एकही अधिवेशन पूर्णत्वास जाऊ नये असे बघत असे, जे अध्यक्ष नियुक्त होतील त्यांना अटक करणे, जी जागा निश्चित होईल तिथे निर्बंध लावणे, त्यातच श्रीमती नेली ह्यांच्याकडे कलकत्ता अधिवेशनाचे अध्यक्षता आली कारण पूर्व नियोजित अध्यक्ष श्री मदन मोहन मालवीय ह्यांना अटक करण्यात आली. श्रीमती नेलीं च्या अध्यक्षीय भाषणा नंतर त्यांना सुद्धा अटक करण्यात आली. ह्या अटक सत्राला त्या घाबरल्या नाहीत तर प्रत्येकवेळी तुरुंगातून बाहेर आल्यावर त्यांनी आपले सामाजिक जीवन तसेच चालू ठेवले. […]

धानी सारे सानिसा

अनघा प्रकाशन दिवाळी अंक २०१८ मध्ये डॉ. नेताजी रा. पाटील यांनी लिहिलेला हा लेख पांडुरंग बुवा फुलावरकर नावाचे प्रसिद्ध भजनीबुवा माझ्या वडिलांचे मित्र होते. उंची सहा फुटांच्या वर, धिप्पाड शरीरयष्टी, तेज:पुंज चहरा, दिलखुलास स्वभाव आणि पहाडी आवाज असलेले बुवा उत्कृष्ठ हार्मोनियम पटू होते. बाजाच्या पेटीवर त्यांची बोटे जादू सारखी चालत. सहीसमाक्षीने गावी आले की मुक्काम आमच्याच […]

९५० पूर्ण

पुढील कार्यक्रम आयोजक अशोक शेवडे यांच्यासाठी दिवाळी पाडव्याला डोंबिवली येथे झाला. ज्येष्ठ गायिका पुष्पा पागधरे यांच्याबरोबर मी गायलो कार्यक्रमाचे निवेदन प्राची देवस्थळी आणि अशोक शेवडे यांनी केले. रोटरी क्लब आयोजित अंध विद्यार्थ्यांसाठीच्या शिबिरात ज्येष्ठ अभिनेते रवी पटवर्धन यांच्या सोबत माझी प्रकट मुलाखत घेण्यात आली. या विद्यार्थ्यांनी गाण्यासंदर्भात विविध प्रश्न विचारले. त्यांचा गाण्याबद्दलचा इतका अभ्यास पाहून मला […]

1 81 82 83 84 85 361
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..