नवीन लेखन...

संवेदनशीलतेतही ‘प्रवीण’

प्रवीण पांडे म्हणजे महसूल विभागातील आगळंवेगळं व्यक्तीमत्त्व. महसूल विभागात आदराने घेतलं जाणारं नाव. आदरयुक्त दरारा ते प्रेमळतेचा अथांग सागरच.महसूल विभाग म्हटलं की, केवळ काम आणि कामच. कधीही विरंगुळा नाही. सतत कोणत्या ना कोणत्या कामाचा मारा सुरुच असतो.त्यात कामातूनच विरंगुळा मिळवून लोकांची कामे झटपट कशी मार्गी लागतील, यावर त्यांचे लक्ष असते.हीच बाब हेरून लोकांची कामे लवकर आणि वेळेत करण्यावर प्रवीण पांडे यांचा भर असतो. […]

।। श्री राम समर्थ ।। समर्थांचा स्त्री दृष्टीकोन व समर्थ शिष्या

“जाम समर्थ” या समर्थांच्या जन्मगावी श्रीराम मंदिर आहे. तेथे जगातील १० वे आश्चर्य अनुभवावयास येते. तेथे सीतामाई श्रीरामांच्या उजव्या बाजूस उभ्या आहेत व येवढेच नाही तर तेथे लग्नकरुन पहिल्यांदा दर्शनास आलेल्या नवरदेवाने आपल्या नवविवाहित पत्निस नमस्कार करावा लागतो हा प्रघात आहे. ही पुरुष प्रधान संस्कृतीला बगल देणारी प्रथा ४५० वर्षापूर्वी श्री समर्थांनी आपल्या राममंदिरात घालून तत्कालीन […]

बॉलीवूडची मैत्री

मैत्री ही फक्त गंमत मजा यासाठी न मर्यादीत रहाता, एकमेकांचा आधारवड बनू शकते, पडत्याला उभारी देउ शकते व एका ध्येयासाठी सर्वांना एकत्र आणू शकते याचे खूप सुंदर दर्शन या चित्रपटातून आपल्याला घडते. हा सिनेमा व्यवसायीक पातळीवर फार यशस्वी नसला तरी याने समिक्षक व चोखंदळ प्रेक्षकांची मने नक्कीच जिंकली होती. फरहान (अभिनयात पदार्पण), अर्जून रामपाल, ल्यूक केनी आणि पूरब कोहली यांनी चारही मित्रांची केमिस्ट्री इतकी सुंदर दाखवलीय की हे चारजण खरेच कॉलेजपासून मित्र होते असे वाटत राहते. मैत्रीत आवडत्या गोष्टी एकत्र येउन करायला स्टेटस, वेळ व वयाचे बंधन नसते हे सिद्ध करणारा चित्रपट होता. […]

पूर्णागिरी

पूर्णागिरी टणकपूरपासून २०-२१ कि.मी. अंतरावर आहे. दिल्लीहून टणकपूरसाठी बससेवा उपलब्ध आहे. साधारण ३३० कि.मी. चे हे अंतर असून या प्रवासाला ९-१० तास लागतात. मोरादाबाद, रूद्रपूर-खतीमा असा हा मार्ग आहे. लखनौ, नैनीतालहूनही टणकपूरला जाता येते. टणकपूर हे बऱ्यापैकी मोठे गाव असून सर्व प्रवासी सोयीसुविधा या ठिकाणी उपलब्ध आहेत. पायथ्याशी असलेल्या या गावाचे मूळ नाव ‘ब्रह्मदेव.’ […]

आनंद माडगूळकर युट्युब चॅनेल

आनंद माडगूळकर यांच्या युट्युब चॅनेलवर गदिमांच्या अनेक किस्स्यांचा, आठवणींचा धमाल मनोरंजनाचा ठेवा उपलब्ध आहे, त्या विश्वात रमण्यासाठी आनंद माडगूळकरांच्या युट्युब चॅनेलला आताच भेट द्या. […]

अनोखी गाणी अनोखी भेट

एक दिवस एक व्यक्ती स्वर-मंचच्या ऑफिसमध्ये आली. त्यांचे नाव संजय पवार. रूबाबदार व्यक्तिमत्त्व आणि खर्जामधील लक्षात राहण्यासारखा आवाज. एका निराळ्या कामासाठी ते भेटायला आले होते. पण समोर हार्मोनियम पाहून त्यांनी चक्क गाणे ऐकवण्याची विनंती केली. हा माणूस गझलचा निस्सीम चाहता होता. त्यांचे काम काही झाले नाही. पण आमची मैत्री झाली. लवकरच त्यांनी ‘प्रेशिया फार्मा’ नावाची स्वतःची […]

लेव्हल क्रॉसिंग गेटस (रेल्वे फाटक)

भारतीय रेल्वेचं जाळं हे शहरं, गावं, खेडी यांना छेदत जातं. रेल्वेमार्गांच्या दुतर्फा वसाहती असतात. या वसाहतींतील रहिवाशांना दोन्ही बाजूंनी जाता-येताना रेल्वेमार्ग ओलांडावाच लागतो. भारतात अशा लेव्हल क्रॉसिंगच्या ३२,६९४ जागा असून, त्यांतील १७,८४१ ठिकाणी रेल्वेचा कर्मचारी २४ तास हजर राहून राखण करतो; परंतु १४,८५३ क्रॉसिंगच्या जागांवर कोणीही कर्मचारी नेमलेला नसल्यामुळे मार्ग असे नेहमीच सर्वांसाठी खुले असतात. जिथे […]

स्मरणशक्ती आणि विस्मरणशक्ती – भाग २ (आठवणींची मिसळ १३)

चिं. वि. जोशींच्या “वायफळाचा मळा” या पुस्तकांत एक लेख आहे. “स्मरणशक्तीचे प्रोफेसर”.लेखकाला गाडीत एक प्रोफेसर भेटतात. प्रोफेसर साहेब लेखकाला स्मरणशक्ती कशी वाढवावी, लहान सहान गोष्टी कशा लक्षात ठेवाव्यात ह्याबद्दल उदाहरणासहीत लेक्चर देतात. […]

पाय

आपल्या हिमतीवर उभे रहाण्यापासून ते xxला लावून पळण्यापर्यंत पायांचा मानवी जीवनात भक्कम पाया आहे. गोष्टींना पाय फुटून त्या नाहीशा होणे किंवा तोंडात पाय (Foot in mouth) घालण्यापर्यंत आपण ऐकलं आहे, पण पायाला तोंड फुटलेलं अजून ऐकिवात नाही म्हणून हा प्रपंच! पाळण्यातले इवले इवले पाय नाचरे निखळ, नितळ निष्पापसे मखमली गोबरे निवांत शांत, भाबडे पहुडले बहुतसे सारे […]

उगाच काहीतरी – ६

अननस घेऊन आलेला शेठ जाताना बखोटयाला धरून तो काटेरी फणस घेऊन गेला आणि मी पुन्हा सलूनवाल्याच्या खुर्चीवर अर्धवट राहिलेली कटिंग पूर्ण करायला निवांत जाऊन बसलो. […]

1 82 83 84 85 86 361
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..