नवीन लेखन...

निर्मात्याचे संगीतकार – कल्याणजी आनंदजी

कल्याणजी आनंदजी हे निर्मात्यांचे संगीतकार होते.असे म्हणण्याचे कारण ते निर्मात्याला हवे आहे तसे देत असत.थोडक्यात ते बनिया वृत्तीचे होते.आणि स्वताला बनिया म्हणवून घेण्यात त्यांना कमीपणा वाटत नसे. […]

मानवपूर्व अग्नी

सन १९७६-७७मध्ये इस्राएलमधील, भूमध्य सागराजवळच्या एव्हरॉन क्वॉरी या उत्खनन क्षेत्रात सुमारे आठ लाख ते दहा लाख वर्षांपूर्वीच्या अश्मयुगीन वस्तू सापडल्या. या वस्तूंत हरणं, पाणघोडे, गवे, यासारख्या दिसणाऱ्या काही तत्कालीन शाकाहारी प्राण्यांच्या कवटीचे तुकडे, दात, इत्यादी अवशेषांचा समावेश होता. तसंच त्या काळात अस्तित्वात असणाऱ्या एका महाकाय शाकाहारी प्राण्याच्या सुळ्याचे तुकडेही तिथे सापडले. प्राण्यांच्या या अवशेषांबरोबरच तिथे गारगोटीच्या दगडापासून बनवलेल्या विविध साधनांचे तुकडे आढळले. हे तुकडे, दोन सेंटिमीटरपासून ते साडेसहा सेंटिमीटरपर्यंत वेगवेगळ्या लांबीचे होते. हे तुकडे ज्या दगडी साधनांचे होते, त्यातली काही साधनं धारदार होती, तर काही साधनं अणकुचीदार होती. […]

एक परीस स्पर्श ( भाग – ४५ )

विजय आज कोणत्यातरी मालिकेचे प्रमो ! पाहत होता.  ज्यात एक नवरा आपल्याला हीच पत्नी सात जन्म मिळावी म्हणून वडाला प्रदक्षिणा घालताना दाखविला होता. तो प्रमो ! पाहून विजयला हसावं की रडावं तेच कळत नव्हतं कारण कालच विजय त्याच्या एका मित्राला त्याच्या कारखान्यात भेटायला ,. गेला होता… तो मित्र विवाहित आहे. त्याला एक मुलगी आणि एक मुलगाही  […]

स्मरणशक्ती आणि विस्मरणशक्ती (आठवणींची मिसळ १२)

“”ज्यात शंभर अब्ज मज्जा पेशी आहेत असा माणसाचा मेंदू म्हणजे जगातले सर्वांत विस्मयकारक, व्यामिश्र (गुंतागुंतीचे), समजण्यास गहनतम असे विद्युत्-रासायनिक यंत्र आहे. शब्द वा ध्वनीसंकेत यातून आपण घरातल्या अजाण बालकाच्या प्राथमिक स्मृती तयार करत असतो. त्याच स्मृतीच्या आधारे बालक आसपासच्या जगाचे अनुभव घेऊ लागते. त्यातुन आपल्या स्वत:च्या स्मृती तयार करून मेंदूला कार्यान्वित करू लागते. […]

उगाच काहीतरी – ५ (टिपिकल भारतीय गृहिणी)

टिपिकल भारतीय गृहिणी: ” अहो, तुम्हाला साधा चहा नीट करता येत नाही, चालले भाजी करायला. राहू द्या तुम्ही” ” तू राहू दे रे कार्ट्या, तू झाडू कमी मारशील आणि कचरा जास्त करशील. मलाच करावं लागेल” ” ताई, तू लादी पुसता पुसता दहा वेळा पडशील आणि कपडे धुणे तर राहूच दे जसेच्या तसे ठेवशील. मीच करते” ………आणि […]

भारतमातेच्या वीरांगना – ५४ – अक्कमा चेरियन

अक्कमा चेरीयन ह्यांनी राज्य कांग्रेसवर लागलेले सगळे प्रतिबंध रद्द करण्यासाठी थंपनूर ते कोडीयार महाला पर्यंत एका विशाल मोर्च्यांचे नेतृत्व केले ज्यात सगळ्यांनी खादी टोपी घातली होती. ब्रिटिश अधिकाऱ्यानी पोलिसांना मोरच्यावर गोळीबार करायला सांगितला, त्यावेळी अक्कमा चेरीयन ह्यांनी गर्जून सांगितले, ‘मी ह्या मोर्च्याची नेता आहे, गोळ्या झाडायच्याच असतील तर माझ्यापासून सुरवात करा.’ अक्कमा चे हे रूप पाहून पोलिसांनी आपले आदेश मागे घेतले. गांधींपर्यत त्रावणकोर ची वार्ता पोचली, त्यांनी अक्कमा चेरीयन ह्यांना ‘त्रावणकोर ची झाशी ची राणी’ अशी उपाधी दिली. १९३९ साली त्यांनी निषिद्ध आदेशांचे उल्लंघन केले अश्या आरोपाखाली ब्रिटिशांनी त्यांना कैद केले. […]

सूर गवसण्याचा आनंद

आपल्या घरात हार्मोनियम असावी अशी माझी खूप इच्छा होती. एक दिवस मी पेटी विकत घेतली आणि ती वाजवायला बसलो. याआधी मी कधीही पेटी वाजविली नव्हती. शुद्ध सूर कोणते, कोमल सूर कोणते, तीव्र सप्तक म्हणजे काय मला कशाचीही काहीही कल्पना नव्हती. मी उगाचच चाळा म्हणून पेटी वाजवत बसलो. बोटं फिरवता फिरवता पेटीतून सूर उमटू लागले. ते सूर […]

बोनसाय

व्यवहार जगती चाले सारे बोनसाय जाहले रक्ताचे नाते ओलसर आज पार गोठुनी गेले अंतरीचे वात्सल्यप्रेमही आज पहा निष्ठुर जाहले प्रेमाचे घरकुलही मोठे घर छोटे कौलारू जाहले देव्हाऱ्यातील देवही सारे घरोघरी, विभक्त जाहले अंगणीचे झाड़ नारळाचे आज पहा कुंडित लागले प्रीतभाव ते महासागरी छोट्या जलाशयी गुंतले नाही कधीच बदलली धरा ऋतुचक्र अजुनही चालले नाही बदलली जलधारा तिथेच […]

श्रावण

श्रावण एक पवित्र महीना असे पुजा-पाठांचा प्रत्येक वारी व्रत वेगळे महिमा देवी-देवतांचा ऊन पावसाचा खेळ चाले नजारा इंद्रधनुष्याचा सणासुदीची सुरुवात होई पहीला सण नागपंचमीचा नारळीभाताची लज्जत भारी सण आगळा रक्षाबंधनाचा कृष्ण जन्माष्टमी साजरी होई तरुणाईत उत्साह दहीहंडीचा अळूवडी आणि अळूचे फतफत बेत शाकाहारी जेवणाचा सत्यनारायण पूजा घरोघरी साधकास लाभ श्रवणाचा श्री.सुनील देसाई १०/०८/२०२२

एका नव्या विश्वात: इंडियन आयडॉल

“अनिरुद्धजी, इंडियन आयडॉल सुरू होणार आहे. त्यांचा ‘कास्टिंग प्रोड्यूसर’ या पदासाठी शोध सुरू आहे. या संदर्भात मुलाखतीसाठी ताबडतोब अंधेरीला येऊ शकाल का?” “मी येतो. पण माझे नक्की काम काय असणार आहे ते समजू शकेल का?” मी विचारले. “सगळी माहिती तुम्हाला देते. तुम्ही लगेच अंधेरीला या.” माधवी उत्तरली. या मुलाखतीसाठी मी व्हिजक्राफ्ट या कंपनीच्या ऑफिसमध्ये पोहोचलो. माझी […]

1 85 86 87 88 89 361
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..