अतिप्राचीन पाकशास्त्र!
आजच्या माणसाचे भाऊबंद असणारी निअँडरटाल ही जाती सुमारे चार लाख वर्षांपूर्वी निर्माण झाली आणि सुमारे चाळीस हजार वर्षांपूर्वी अस्तंगत झाली. आजचा माणूस – होमो सेपिअन्स – हा तीन लाख वर्षांपूर्वी जन्माला आला. या दोन्ही जाती दीर्घ काळ एकाच वेळी अस्तित्वात होत्या. अतिप्राचीन काळच्या या दोन जातींचा आहार नक्की कोणता होता, याबद्दल संशोधकांत मतांतरं आहेत. […]