कॉन्ट्रॅक्ट (कथा)
सरकारचा आदेश निघाला.. देशाच्या पंतपरधानानं सवता टीव्ही वर येऊन १८ तारखीपासून पुढं दोन आठवडे कोणी बी कामाबिगर घराबाहेर निघायचं न्हाई.. घोळका करून उभं राहायचं न्हाई..घोळक्यानं कुठं जायचं न्हाई का यायचं न्हाई.. बाहीर जाताना तोंडावर कापडाची पट्टी म्हणजी मास्क का काय ते बांधूनच जायाचं.. आसं सांगितलं.. […]