कागदातील तंतू
गवत, लाकडाचा भुसा, कापडाच्या चिंध्या हे कागद तयार करण्यासाठी लागणारे मुख्य पदार्थ हे तंतुमय असतात. कागद म्हणजे तंतुमय पदार्थांची चटई. कागद तयार करताना तंतूंची भूमिका फार महत्त्वाची असते. गवत, लाकडाचा भुसा, कापडाच्या चिंध्या या पदार्थातील महत्त्वाचा घटक म्हणजे सेल्युलोज. सेल्युलोजमुळे वनस्पती जमिनीवर ताठपणे उभ्या राहू शकतात. […]