निमित्त : १
‘उरी ‘ पुन्हा पाहिला आणि त्यानंतर लगेचच ‘ ऍक्सिडेंटल प्राइमिनिस्टर ‘ पाहिला , आणि खरं सांगतो राहवलंच नाही. लेखणी पुन्हा हाती घेतली. […]
‘उरी ‘ पुन्हा पाहिला आणि त्यानंतर लगेचच ‘ ऍक्सिडेंटल प्राइमिनिस्टर ‘ पाहिला , आणि खरं सांगतो राहवलंच नाही. लेखणी पुन्हा हाती घेतली. […]
सावळा विठ्ठल माझ्या घरी आला. रखुमाबाई सवे गाभाऱ्यात विसावला… माझ्या माय बाईची पुण्याई फळा आली. जणु पंढरपूर अवघी माझ्या घरीच दुमदुमली… गोजिरे साजिरे ते रुप सुंदर मनोहर. पाहताच विसरून गेले हे भवसागर… तू आहेस अनाथांचा नाथ पंढरीनाथ. शरण आले तुला जोडोनिया दोन्ही हात.. तुम्ही येता दोघेही घर झाले माझे पवित्र मंदिर. घरच नाही तर माझे मनही […]
हे कधीतरी घडणार होते आचके देत रुग्णालयात आय सी यु मध्ये असणाऱ्या रुग्नाप्रमाणे शेवटी महाराष्ट्र परिचय केंद्राचे पणजीतलं कार्यालय बंद पडले व शेवटी महाराष्ट्राशी असणारा दुवा निखळला असे खेदाने म्हणावे लागेल. […]
समकालीन भारतीय साहित्य पत्रिकेला पंचवीस वर्ष पूर्ण झाल्याबद्दल साहित्य अकादमीने विभिन्न भारतीय भाषेतील निवडक साहित्य “चयनम “ नावाने नुकतेच प्रकाशित केले आहे. समकालीन भारतीय साहित्य पत्रिकेचे संपादक व हिंदी साहित्यिक श्री अरुण प्रकाश यांनी “चयनम “ चे संपादन केले आहे. साहित्य अकादमीच्या सुवर्ण जयंती वर्षा निमित्त ही योजना अस्तित्वात आली आहे. […]
१९५० पर्यंत घराघरात तांब्या-पितळेची भांडी वापरली जात. पितळेच्या भांड्यात ठेवलेल्या आंबट पदार्थांची चव बदलते त्याला कळकणे म्हणतात. त्यासाठी ‘भांड्यांना आतून कल्हई केली जाई. कल्हई करणे म्हणजे कथलाचा (टिन) मुलामा देणे. १९५० च्या सुमारास बाजारात स्टेनलेस स्टीलची भांडी नुकतीच डोकावू लागली होती. साधारण त्याच सुमारास बाजारात प्रथम कचकड्याच्या वस्तू दिसू लागल्या. या वस्तू टेबलावरून खाली जमिनीवर पडल्या तर पिचत किंवा फुटत. कचकड्याच्या निमित्ताने प्लास्टिकची ही पहिली ओळख भारतीय समाजाला झाली. […]
ग्रीनलँड हा पृथ्वीवरचा अतिउत्तरेकडचा प्रदेश आहे – उत्तर ध्रुवाजवळचा! या प्रदेशाचा उत्तरेकडचा भाग म्हणजे एक शीत मरुभूमी आहे. अत्यंत कोरडी आणि थंड हवा असणारा हा प्रदेश अगदी वैराण आहे. इथल्या जमिनीतलं पाणी हे सतत गोठलेल्या अवस्थेत असतं. इथल्या अतिप्राचीन काळातील वनस्पतींची आणि प्राण्यांची फारशी माहिती उपलब्ध नाही. […]
१९५२ साली प्रा. झिग्लर यांनी बनवलेल्या पॉलिथिलीनमध्ये ॲलिम्युनिअम ट्रायअल्कील व टीटॅनियम टेट्राक्लोराइड यापासून बनवलेला साहाय्यक पदार्थ प्रक्रियेसाठी वापरला होता. नंतर प्रा. नाटा या इटालियन शास्त्रज्ञाने हा साहाय्यक पदार्थ बदलून त्याऐवजी प्रोपिलीन वापरले. त्यामुळे पॉलिथिलीन अधिक मजबूत बनले. १९५६ मध्ये पॉलिअॅसिटलचा आणि १९५७ साली पॉलिकार्बोनेटचा उदय झाला. […]
विसाव्या शतकात स्वयंपाकघरातील मिक्सरची जागा फूड प्रोसेसरने घेतली. मिक्सरच्या मदतीने काही कामे जरूर करता येतात पण त्याला मर्यादा आहेत. त्यामुळेच पीठ मळणे, भाज्यांच्या चकत्या करणे, काही फळभाज्या किसणे, फळांचा ज्यूस करणे अशी अनेक कामे करणारे वेगवेगळ्या भांड्यांचे जोड असलेले एकच उपकरण असावे यातून फूड प्रोसेसर (अन्न संस्कारक) तयार करण्यात आला. […]
मुंबईतील घाटकोपरच्या पूर्वेला असलेला गारोडिया नगर हा भाग पहिल्यापासूनच उच्चभ्रू गुजराथी समाजाचा. प्रामुख्याने केमिकल्स चे कारखानदार , हिरे , किंमती खडे याचे व्यापारी यांची निवासस्थाने असलेला. फेब्रुवारी १९९० मधे या परिसरातील इमारतीमध्ये पाचव्या मजल्यावर राहणाऱ्या एका वृद्ध जोडप्याला राहत्या घरात लुटल्याची घटना घडली. […]
Copyright © Marathisrushti.com 1995-2025 | Technology Partners : Cybershoppee | GaMaBhaNa | Smart Solutions