MENU
नवीन लेखन...

जादू

आपल्या एकुलत्या एक लेकीचा पाचवा वाढदिवस त्याला अगदी जंगी साजरा करायचा होता. एका हॉल मध्ये सगळ्याचं कंत्राटच दिलं होतं. रंगीबेरंगी फुगे, कार्टूनची सजावट, एका कोपऱ्यात टॅटू काढणारा, एक जण वेगवेगळे मास्क वाटणारा वगैरे वगैरे जय्यत तयारी केली होती. हळूहळू पाहुणे येऊ लागले. भेटीगाठी-गप्पा सुरू झाल्या. थोड्यावेळाने बहुतांश निमंत्रित आले आणि त्याने तिथल्या व्यवस्थापन करणाऱ्याला कार्यक्रम सुरू […]

एकमेव जयते….

सर्वच दैनिक,’सर्वांधिक खपाचे एकमेव दैनिक’ असतात. मग ते सर्व दैनिक कोणते याचा मी शोध घेतो आहे. तसेच ,’गरम जिलेबी मिळण्याचे एकमेव ठिकाण’ दूसऱ्या गरम जिलेबीवाल्याच्या शेजारी असते. ‘आपल्या मतदारसंघाचे भले करणारा एकमेव नेता ‘ असे सर्वच उमेदवारांचे प्रचारक म्हणतात. ‘पर्यटकांच्या पसंतीची एकमेव यात्रा कंपनी’ अशा हजारों कंपन्या असतांना निर्धास्तपणे लिहिले जाते. तसेच ‘थंड रस मिळण्याचे एकमेव […]

चिक्कूची ‘बी’

फेसबुकवर आज एक पोस्ट वाचनात आली. निवृत्तीला आलेल्या एका गृहस्थांनी, निवृत्तीनंतर पत्नीसह स्वतंत्र राहण्यासाठी एक छोटा फ्लॅट घेऊन ठेवला होता. मुलाचं त्याच्या मैत्रिणीशी लग्न लावून दिल्यावर ते दोघे पती-पत्नी दोन्ही वेळच्या जेवणासाठी एकत्र येऊन नंतर आपल्या फ्लॅटमध्ये राहू लागले. त्यावर सुनेने विचारले, ‘मला सर्वजण नावं ठेवतील, माझ्या त्रासामुळे तुम्ही स्वतंत्र राहू लागलात म्हणून. […]

साबणातील घटकद्रव्य

खेळून आल्यावर साबणाने हात-पाय स्वच्छ धू.’ असं संध्याकाळच्या वेळी प्रत्येक घरात आईचं हे वाक्य ऐकायला मिळतं. अस्वच्छ हात-पाय फक्त पाण्याने स्वच्छ होत नाहीत. त्यासाठी साबण वापरावा लागतो. कसं बरं तयार करतात साबण? अल्कली मोनोकार्बोक्सिलिक आम्ल (फॅटी अॅसिड) यामध्ये अभिक्रिया होऊन साबण आणि ग्लिसरीन तयार होतं. […]

या मसाल्यात दडलंय काय? – भाग तीन

७) जिरे- बहुतेक मसाल्यात व सुवासिक द्रव्यात याचा वापर. भारत व चीन मसाले मुख्य उत्पादक. एकेकाळी जिरे युरोपात चलनासारखे वापरात होते. राजांच्या कलेवरांना याचा लेप लावायचे. पडसे, खोकला, पोटातील वायू कमी करण्यासाठी, पाचक, स्वादुपिंड, विकर उत्तेजक म्हणून वापर. कर्करोगप्रतिबंधक, (यकृत व जठराचा) यकृतातील निर्विषीकरण विकर उत्तेजक, अॅण्टिऑक्सिडंट, शरीरातील प्रतिकारशक्ती वाढवतात. प्रथिने १७.७%, मेद २३.८, तंतू ९, […]

ममींची कार्यशाळा

ममी हा इजिप्तच्या पुरातन इतिहासाचा अविभाज्य भाग आहे. ममी म्हणजे इजिप्तच्या राजघराण्यातील, तसंच तिथल्या सधन लोकांची, प्रक्रियेद्वारे जतन करून ठेवलेली शवं. ममीद्वारे मृताचा अनंताकडचा प्रवास सुरू होत असल्याचं मानलं जायचं. त्यामुळे ममी ही अगदी रूढीपूर्वक तयार केली जायची. […]

बेकेलाइट प्लास्टिक

प्लास्टिकला अगदी सहजगत्या पाहिजे तसा आकार देता येतो. ज्या वस्तूंना कमी-जास्त दाबाने अथवा उष्णता व दाब या दोन्हींच्या साहाय्याने हवा तो आकार प्राप्त करण्याचा गुणधर्म असतो ती वस्तू प्लास्टिक आहे असे समजतात. प्लास्टिकला अंग व मजबुती देण्याकरता रंगद्रव्य, पाणी व तंतूमय पदार्थ वापरतात. तथापि त्याला आकार देण्याचे व आकार धारण करण्याचे कार्य करणारा मुख्य घटक हा उच्च भाराचा कार्बनी पदार्थ असतो. या आकारी कार्बनी घटकाला अनेक वेळेला रेझिन असे म्हणतात. […]

या मसाल्यात दडलंय काय? – भाग दोन

३) हळद- वनस्पती शास्त्रातील नाव कर्क्यूमा लाँगा, याचे जमिनीतले खोड म्हणजे हळदकुंड. पुराणकाळापासून मंगलकार्यातील व पाककृतीत मानाचे स्थान. पदार्थांना रंग व चव देणारी हळद आहेच तशी गुणकारी. सांगली सर्वात जास्त हळद पिकविणारी व निर्यात करणारी. पिढ्यान्पिढया हळद कृष्णाकाळच्या भूमिगत गोदामात साठवली जाते. जखम झाल्यास रक्तस्त्राव थांबवण्यासाठी व जंतुप्रतिबंधक म्हणून हळद लावण्याचा प्रघात आहे. हळदीमध्ये लोहाचे प्रमाण […]

शोधा म्हणजे सापडेल!

“आई आता बास झालं हं तुमचं, चांगुलपणा शोधणं! प्रत्येक गोष्टीत चांगुलपणा पाहावा, चांगुलपणा शोधावा हे ऐकून ऐकून आम्ही कंटाळलो. आयुष्यभर चांगुलपणा शोधून तुम्हाला मिळालं काय, ते तरी कळू दे.” वृंदा चिडून चिडून बोलत होती आणि तितक्याच थंडगारपणाने त्यांनी उत्तर दिलं, “तुझ्यासारखी सून मिळाली.” […]

मास्तर दत्ताराम – गोव्याचे भूषण

गोव्याने अनेक दिगग्ज कलाकार रंगभूमीला दिले आहेत.आपल्या कर्तृत्वाने तिथे आपले स्थान निर्माण केले असलेले एक म्हणजे मा दत्ताराम. एकदा का चेहऱ्याला रंग चढला कि ते त्या भूमिकेत शिरायचे, त्या रंगमंचाचे वातावरण जणू त्यांचा कायापालट करत. त्या नन्तर ते कधी रसिकांच्या मनावर अधिराज्य करत हे कुणालाच कळत नसे. […]

1 2 3 4 6
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..