रक्ताच्या विशेष तपासण्या का कराव्या लागतात ?
वरील तपासण्या खालील रोगांत प्रामुख्याने करतात. मधुमेह यासाठी रक्ताची उपाशीपोटी, जेवणानंतर दोन तासांनी तपासणी करतात. बरोबर लघवीपण तपासतात. यात रक्तातील साखर मोजतात. उपाशीपोटी साखरेचे प्रमाण ७० ते ११० मिलिग्रॅम परसेंट व जेवणानंतर १४० मिलिग्रॅम परसेंट असते. यापेक्षा जास्त प्रमाण आढळल्यास व सातत्याने २-३ वेळा हे प्रमाण जास्त असल्यास मधुमेहाचे निदान करतात. मधुमेहात नंतरच्या काळात मायक्रोअलब्युमिन आढळते. […]