गारेगार बर्फाचा गोळा
उन्हाळा म्हटलं की डोळ्यासमोर दिसतो तो गारेगार बर्फाचा गोळा. त्याशिवाय उन्हाळा अपूर्णच वाटतो. काल रस्त्यावर बर्फाचा गोळा विकणारा आला होता. शेजारीन म्हटली, ” घ्यायचा का बर्फाचा गोळा ” ? क्षणभर मनात उत्तर आलं होतं लगेचच ” हो ” म्हणून !! पण मनाला आवर घालत म्हटलं , ” नको !! आता ते येतील इतक्यात. आणि त्यांना नाही आवडत रस्त्यावरचे गोळे किंवा कुल्फी घेतलेली !! ” शेजारीन म्हटली ते यायच्या आत घ्या पटकन खाऊन. […]