अलक – पैसा
संयम दिनूची ठिगळ लावलेली चड्डी आणि विरलेला शर्ट असला तरी त्याची भेगाळलेली पाटी स्वच्छ असायची. खिशात पेन्सिलचा एक इंचाचा एकच तुकडा. त्याचं अक्षर इतकं छान की त्याची गरिबी या रेखीव सौंदर्याने झाकून जायची. मधल्या सुट्टीत किशोर पेन्सिलच्या पैशात अर्धी लेमनची गोळी विकत होता. तेव्हा दिनू त्याची नजर चुकवून खिशातली पेन्सिल घट्ट धरत परत वर्गात जाऊन बसला. […]