नवीन लेखन...

बांधणी भाषेची आणि दडलेले अंतरंग

मराठी भाषा,भाषेचे उच्चार, लहेजा, त्यामधून डोकावणारं आणि ऐकणाऱ्याला जाणवणारं वेगळेपण, भाषेचे वळसे, वेलांट्या, वळणं आणि त्यामधून बाहेर येणारं पोटातलं या सगळ्याची एक गंमत असते नाही ?
घाबरून जाऊ नका ! मी काही मराठी भाषा आणि तिच्यावर साधक बाधक चर्चा यामध्ये अजिबात शिरणार नाहीय. […]

आरोग्य धनसंपदा

ध्यान धारणा ही ,शांतता मनाची आरोग्य धनाची, गुरुकिल्ली || सात्विक आहार, कंद मुळा भाजी खावी रोज ताजी, सर्वकाळ || ॠषीतुल्य झाड, पिंपळ उंबर वड हो अंबर, महाराजा || वृक्ष करीतसे, धरती श्रृंगार ही हिरवीगार, दिसतसे || पहाटे उठणे, करा रोज योग सरतील भोग, शरीराचे || शुद्ध हवा पोटी, रोग हे सरेल आनंद भरेल, गगणात || राखा […]

रामदासी मी

श्रीराम प्रभू माझ्या मनी असे कंदकृर्ती ग्रामी मज दिसे एकच मुखी नाम असे श्री राम जय राम जय जय राम चैत्र शुद्ध नवमीला यात्रा भरे रामभक्तांना सुखावह करे भोगी सुख रामगण सारे श्री राम जय राम जय जय राम राम स्वयंभू जागृत स्थान असे पवित्र गोदाकाठी रममाण दिसे राम भक्ती शिवाय माझे जीवन कसे श्री राम […]

आजी आजोबांचा व्हॅलेंटाईन वीक”

एक होती साधीभोळी आजी , पण आजोबा होते कहर ! काहीतरी वेगळं करण्याची, आजोबांना मध्येच आली लहर !! “यावेळेस आपण करूया का गं, प्रेमाचा आठवडा साजरा ?” लाजत मुरडत हो म्हणत , आजीने लगेच माळला गजरा !! “रोझ डे” चा गुलाबी दिवस , केला गोडाधोडाचा भडीमार ! एकमेकांना भरवला गुलकंद , मग रोझ सरबत थंडगार !! […]

एका कपड्याचा रंग दुसऱ्या कापडाला लागला तर तो सहज जात का नाही?

सहसा आपण धुवायचे कपडे साबणाच्या पाण्यात भिजवतो, त्यामुळे असे रंगीत कपडे व इतर पांढरे किंवा अन्य एकत्र भिजवल्यास ह्या रंगीत कापडाचा रंग काहीवेळा दुसऱ्या कपड्याला लागतो. साबणाच्या पाण्यात ही प्रक्रिया अधिक जलद होते. […]

नवं कुटुंब

‘काय दादानू? कसल्या गजाली चलल्यात?’ मनोहरच्या प्रश्नाने दोघेही आपल्या विचारचक्रातून बाहेर आले. ‘काही नाही रे, संध्याकाळ झाली की जरा एकटेपणा वाटतो.’ संजय म्हणाला. ‘दिवस जातो मजेत. पण संध्याकाळला कातरवेळ म्हणतात ते उगीच नाही. मन सैरभैर होतं, कारणाशिवायच.’ सुजाताही म्हणाली. […]

आयुष्य ज्यांना फितूर आहे…

जाणोनी लोटली मी या वादळात होडी’ ही सचोटी भीमसेन यांच्या गाण्यात जशी होती तशीच गाडी चालवण्याबाबत. गाणं असेल तेव्हा किंवा डोक्यात राग असला की भीमसेन निघालेच ड्रायव्हिंग करत. वाट कुठे फुटेल तिकडे. ते कोठे हे त्यांना देखील माहित नसायचं. त्यामुळे इतरजण शोधत बसत कुठे कुठे… […]

नेमकं वजन मोजायचं योग्य साधन कोणतं?

भाजीचं वजन करतांना भाजीवाला तराजू नावाचं जे साधन वापरतो, त्याने तो भाजीचं वजन मोजत नाही. तो फक्त मापाचं वजन आणि भाजीचं वजन यांची तुलना करतो. मग एखाद्या वस्तूचं वजन करायचं असेल तर काय करता येईल? […]

बाप विठूराया

आषाढी कार्तिकी जसा पाहतसे वाट तसा माझा बाप गावी उभा राऊळी डोळ्यात जशी विठूच्या प्रतीक्षा लेकरांची म्हाताऱ्या बापाचीही अवस्था तीच त्याला तरी आहे विटेची सोबत थकलेला माझा बाप उरे एकाकी आणावे वाटते शहरात त्याला पण नाही हवा म्हणे मानवत उमगते मला तगमग त्याची पण भ्रांत पोटाची करी हतबल गावच्या मातीशी त्याची नाळ जुळलेली अन् शहराच्या बेड्या […]

भिंत

( आगरी भाषेत (भिवंडी भागातील) ग ऐवजी ज, ग किंवा घ ऐवजी झ, ण ऐवजी न, ड ऐवजी र, ळ ऐवजी ल तसेच काय ला क, आहे ला ह आणि मी व मला ऐवजी मना असे शब्द वापरले जातात, आगरी बोलीभाषेतील शब्द वापरून कथा लिहिण्याचा छोटासा प्रयत्न केला आहे.) हॅलो, वंसा, मी मंगल बोलताव, तुमी कई […]

1 13 14 15 16 17 20
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..