चण्याची पुडी
माझे मन आहे चण्याची पुडी जड विचारांची तळाशी बुडी भरले आहेत चणे फुटाणे तेच चव साधती साधेपणे मावत नाही काजू अक्रोड कशास हवी ती डोकेफोड ? लांब ठेविले बदाम मनुके यास्तव मन हे हलके फुलके चणा वाटतो आपलाच सहज बाकी भासती किंमती ऐवज नको बेदाणे खारीक पिस्ते तेच घडविती विवाद नस्ते चघळत बसतो एक चणा मुरवत […]