April 2023
अविस्मरणीय क्षण
आयुष्यात अशा काही घटना घडून गेलेल्या असतात, ज्यांची पुन्हापुन्हा उजळणी करावीशी वाटते. काही हक्काची ठिकाणे असतात_ मनाला उभारी देणारी, जगण्याची नवी उमेद देणारी… ज्यांच्या आठवणीत आपण रमून जातो, कधी अभिमानाने उर भरून येतो..प्रसंगी हळवेही होतो. माझ्यासाठी माझी बँक ही त्यापैकीच एक. […]
मलेरिया
मलेरिया हा प्लासमोडियम प्रजातीच्या परजीवीमुळे होणारा एक संसर्गजन्य आजार आहे. मलेरियाचा उल्लेख इजिप्तच्या फॉरोंमध्ये व चरक संहितेतही सापडतो. आधुनिक युगात सर रोनॉड रॉस या ब्रिटिश भारतीय सेनेच्या डॉक्टांनी मलेरिया डासांद्वारे पसरतो हे सिद्ध केले. व्हायव्याक्स, फॉलसिपॉरम, ओव्हेल व मलेरिए हे प्लासमोडियम प्रजातीचे चार मुख्य प्रकार आहेत. भारतात व्हायव्याक्स व फॉलसिपॉरम सर्वात अधिक प्रमाणात आढळून येतात. प्लासमोडियम […]
स्पोर्टस् टुरिझम
आणखी एक असाच खेळ ज्यासाठी प्रेक्षक वर्षभरात आवर्जून हजेरी लावतात.. तो म्हणजे टेनिस… ह्यातल्या चार ग्रँड स्लॅम स्पर्धांना.. फ्रेंच ओपन टूर्नामेंट, अमेरिकन ओपन टूर्नामेंट, ऑस्ट्रेलियन ओपन टूर्नामेंट आणि सर्वात मानाची म्हणून ओळखली जाणारी विम्बल्डन टेनिस टूर्नामेंट… ह्या ही प्रत्येक स्पर्धसाठी त्यातील होणाऱ्या सर्व सामन्यांना मिळून, पर्यटक लाखाहून अधिक संख्येने उपस्थित राहून खेळातील उत्कंठा कायम ठेवतात. […]
आपला प्रवास खूप छोटा आहे…
मी बसने प्रवास करीत होतो. माझ्या पुढच्या बाजूला एक तरुणी बसलेली होती, तिच्या शेजारची सीट सोडली तर संपूर्ण बस भरलेली होती. पुढच्या स्टाॅपवर एक लठ्ठ स्त्री सामानाने भरलेल्या दोन पिशव्यांसह पुढील दरवाजातून बसमध्ये चढली व त्या मुलीच्या शेजारी रेटून बसली. मी तिला न राहवून विचारले की, ‘तू तिला काहीच कसे बोलली नाहीस?’ तिने स्मितहास्य करुन उत्तर दिले, ‘अनावश्यक वाद घालण्यात काही अर्थ नाही, आपला एकत्र प्रवास हा खूप छोटा आहे. […]
डेंग्यू
डेंग्यू हा उष्णकटीबंधात आढळणारा तापाचा प्रकार आहे. हा आजार फ्लेविवायरस या प्रजातीच्या विषाणूंमुळे होतो. एडीस प्रजातीच्या डासांमुळे हा आजार माणसांमध्ये पसरतो. डेंग्यू ताप असलेल्या रुग्णाला चावल्यामुळे हा विषाणू डासात जातो. हे डास सकाळच्या वेळी माणसांना चावतात आणि आजार पसरतो. या तापाची लक्षणे निराळी आहेत. एके दिवशी अचानक खूप डोकेदुखी, हातपायदुखी, सांधे-| कंबरदुखी सुरू होते आणि नंतर […]
चाणाक्षपणा
साधारण 50 वर्षांपूर्वी बँक ऑफ बडोदाच्या झवेरी बाजार शाखेत कृष्णादवाला म्हणून प्रमुख प्रबंधक होते. बँकिंग लॉपेक्षा प्रॅक्टीसमध्ये हुशार होते. क्लार्क वर्गात त्यांचा दरारा बरोबर आदरही होता. कोण कामसू, कोण कामचोर ते बरोबर हेरायचे. बँकेतील प्रत्येक विभागाचे त्यांना पूर्ण ज्ञान होते. बुक बॅलंसिंगमध्ये त्यांचा हातखंडा होता. […]
चवीने खाणार त्याला आरोग्य लाभणार!
अम्ल रस हा उत्तम पाचक आहे. त्यामुळे उतारवयात होणाऱ्या मलावष्टंभ व इतर पचनविकारांवर रामबाण. आपल्याकडे पूर्वापार आलं-लिंबू पाचक बनविले जाते ते याचेच उदाहरण. अम्ल रसाची आणखी एक विशेषता म्हणजे, यामुळे एक प्रकारची तरतरी येऊन थकवा दूर होतो. सर्व सरबतं डोळ्यांसमोर आणा, म्हणजे सहज लक्षात येईल. पण याच्या अति सेवनामुळे मात्र स्नायू, यामध्ये शिथिलता येते, तसेच विविध त्वचारोगांचीही उत्पत्ती होते. […]
श्वेतप्रदर
योनीमार्गे होणारा अतिरिक्त पांढरा स्त्राव हा अनेकदा स्त्रियांना त्रासदायक वाटतो. सतत योनीमार्गे होणारा हा स्राव नेहमीच्या नैसर्गिक | स्त्रावापेक्षा अधिक प्रमाणात होतो. अशा निरुपद्रवी स्त्रावाबद्दल अधिक माहिती घेऊ.. अशा वेळी जननेंद्रियाच्या ‘भग’ (व्हलवा) भागात सतत ओलावा राहणे व कपड्यांवर पांढरट पिवळसर डाग पडणे ही प्रमुख लक्षणे असतात. या स्रावामुळे कधी खाज येत नाही, स्राव पूयुक्त नसतो […]
वनवास
कोण म्हणतं वनवास दःखाचा होता? तिथे तर राम फक्त माझा होता। ती पर्णशाला उभारलेली त्याच्या समर्थ बाहूंनी मीच तर होते – तिथली अनाभिषिक्त महाराणी तिला प्रीतीच्या सुवास होता.. कष्टाचा सुगंध होता कोण म्हणतं वनवास दुःखाचा होता? कधी तो जायचा रानात दूर.. तेव्हा उरायचे मी नि माझं घर मला एकांत सुसह्य व्हावा म्हणून लता हसायच्या सुरेख फुलांच्या […]