कोकण समुद्र : त्यातील जीव आणि वनस्पती वैभव
समुद्राचं जग समजून घेण्यासाठीच आपल्याला त्याच्या अधिवासांची ओळख करून घ्यायला हवी. समुद्राचं जग सुरू होतं वाळूच्या किनाऱ्यापासून! वालुकामय, चिखलयुक्त किंवा खडकाळ किनारे, किनाऱ्यांवरील खारफुटीची जंगले, खाड्या आणि प्रवाळांचे क्षेत्र हे या सागरी जगाचे महत्त्वाचे भाग. त्या-त्या प्रदेशानुसार इथली जैवविविधता बदलते आणि त्यामुळेच कोकण किनारपट्टी ही समृद्ध बनते. […]