उगवत्या सूर्याचा नि भव्य मंदिरांचा देश – जपान
दि व्यत्वाचा वास जिथे जाणवतो, मन:शांतीची अनुभूती येते त्या वास्तूला प्रत्येक भाविकाच्या हृदयात एक अढळ स्थान असतं. मग भले तिथलं आराध्य दैव वेगळ्या धर्माचं, वेगळ्या पंथाचं असेल. ती कदाचित युरोपातील भव्य चर्च, सिनेगॉग असतील किंवा पूर्व आशियातील बौद्ध आणि हिंदूंची प्राचीन मंदिरं. जपानमधील पर्यटनात या मंदिरांचा फार मोठा वाटा आहे. त्यांचं वास्तुशिल्प अतिशय कलात्मक असतं आणि परिसर तितकाच मनमोहक. […]