स्टेट बँक माझी सखी
स्टेट बँकेत नोकरीला लागण्याआधी मी, सात वर्ष अनेक प्राईव्हेट नोकऱ्या केल्या. पण या काळातच आपण स्टेट बँकेतच नोकरीला लागायचे हे माझे ठरलेले होते. याला दोन कारणे होती एकतर माझा एस.के. नावाचा एक चुलत भाऊ स्टेट बँकेच्या मुंबई मुख्य शाखेत नोकरीला होता, मी अनेकवेळा त्याला भेटायला स्टेट बँकेत जायचो आणि ही स्टेट बँक मला तेंव्हापासूनच आवडली होती. […]