नवीन लेखन...

आश्वासक साहित्याची नोंद

अस्वस्थ क्षणांच्या नोंदी हा हेरंब कुलकर्णी यांचा कवितासंग्रह हाती आला. यातील अनेक कविता सोशल मीडियावर गाजलेल्या आहेत.फेसबुक वॉल वर या कविता वाचता क्षणीच यातील प्रखर सामाजिक संदर्भ साक्षात उभा राहतो.सामाजिक ,शैक्षणिक क्षेत्रात सक्रिय भाग घेत असताना अस्वस्थ क्षणांच्या नोंदी हेरंब ने अचूक नोंदवल्या आहेत. कष्टकरी जनतेच्या प्रश्नांचा अभ्यासपूर्ण मागोवा घेताना काही कविता नोंद केल्या आहेत. […]

अमेरिकन शाळेत पोलिस, फायर फायटिंगवाले

अमेरिकेत पोलिस यंत्रणेकडे सामान्य नागरिकाचा सहृदय मित्र म्हणूनच पाहिले जाते. घरात काही गडबड झाली आणि विशिष्ट नंबर फिरविला तर पाच मिनिटात पोलिस घटनास्थळी पोहोचतात. लहान मुलांच्या बाबतीत तर ते अधिक तत्पर, संवेदनशील आणि संरक्षक असतात. […]

खांदेदुखी (मध्यम वयातील)

मध्यमवयात खांदादुखीला सुरुवात झाल्यास अनेक कारणे असू शकतात. याही वयात खांदा वळविणाऱ्या स्नायूंना इजा होऊ शकते. निरनिराळ्या प्रकारच्या संधीवाताच्या रोगामुळे खादा दुखू शकतो. अनेक वेळा मानेतील हाडात वयोमानाने होणाऱ्या बदलाने (स्पॉन्डिलेसिस) तसेच दोन मणक्यातील गादी सरकल्याने खांद्याच्या भागात तसेच खांद्याच्या आजुबाजूला दुखू शकते. पुन्हा पुन्हा एकच प्रकारचे छोटे वजन उचलण्याचे किंवा सुतारासारखे सतत हातोडा चालविण्याचे काम […]

मन्ना लिजा

पॅरिसमधील जगप्रसिद्ध लुव्र संग्रहालयाला रोज हजारो पर्यटक भेट देतात. १९५६ सालची गोष्ट आहे, नेहमी प्रमाणे संग्रहालयामध्ये पर्यटकांची गर्दी होती. त्यातील एका माथेफिरू पर्यटकाने जगप्रसिद्ध मोनालिसाचे चित्र पाहताना आपल्या हातातील दगड दहा फुटावरील चित्राच्या दिशेने भिरकावला. तो दगड चित्राला लागून तेथील रंग खरवडला गेला. सुरक्षारक्षकांनी त्या माणसाला पकडले व त्याच्यावर रितसर कारवाई केली. लुव्र संग्रहालयाने त्यानंतर मोनालिसाच्या […]

खांदा (Sholder Joint)

खांद्याच्या सांध्याला उखळीचा सांधा म्हणता येईल. फऱ्याच्या हाडाच्या उखळीत- दंडाच्या हाडाचे डोके (ह्युमरल हेड) (स्क्युँपुला) फिरते व हा सांधा तयार होतो. परंतु ही उखळ फारच कमी खोल, अधिक पसरट असल्याने दोन गोष्टी होतात. १) या सांध्याच्या हालचाली अधिक व्यापक व सर्व बाजूनी गोलाकार (ग्लोबल) होऊ शकतात- हा फायदा २) उखळ फारच पसरट असल्यामुळे हा खांदा कमी-जास्त, […]

अमिबाजन्य विकार

जगातील अंदाजे १० टक्के लोकसंख्या अमिबाजन्य विकाराने बाधीत आहे. अमिबाजन्य विकार एष्टअमिबा हिस्टोलिटिका या अंतःपरजीवीमुळे होतो. माणसात याचा संसर्ग अन्नावांटे होतो. चार केंद्रके असलेली याची पुटी (सिस्ट) बाधीत अन्न व पाण्याद्वारे पोटात जाते. माशा, झुरळे यांच्यामुळे रुग्णाच्या विष्ठेतील अमिबाच्या पुटी अन्न व पाण्यात पसरतात. साधारणपणे जगातील ४० ते ५० लाख लोकांना याची लागण होते व ४० […]

दूषित अन्नपाण्यातून होणारे आजार – (२)

टायफॉइड- उलट्या होणे, पोट दुखणे आणि मुख्यतः ताप येणे ही टायफॉइडची लक्षणे. तापाची तीव्रता काही रुग्णांमध्ये कमी असते तर काहींमध्ये अगदी थंडी भरून खूप ताप येतो. थकवा खूप येतो. खोकलाही असू शकतो. सहसा हा आजार जीवघेणा नसतो, पण बरा होण्यासाठी बरेच दिवस किंवा आठवडेही लागू शकतात. औषधांना दाद न देणाऱ्या टायफॉइडमध्ये दहा ते चौदा दिवस शिरेतून […]

फुलपाखरांचं मूळ

फुलपाखरं ही पृथ्वीवरच्या विविध ठिकाणच्या परिसंस्थांतील अत्यंत उपयुक्त घटक आहेत. वनस्पतींच्या प्रजोत्पादन क्रियेत त्यांचा महत्त्वाचा सहभाग आहे. फुलांतील मकरंदाचं सेवन करताना, फुलपाखरं ही या फुलांचं परागीभवन घडवून आणतात. या परागीभवनाद्वारे वनस्पतींच्या पुढच्या पिढीच्या निर्मितीचा पहिला टप्पा गाठला जातो. त्यामुळे, वनस्पतिसृष्टीत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या या प्राणिसृष्टीतील घटकांचा जन्म केव्हा व कुठे झाला असावा, हे जाणून घेणं औत्सुक्याचं ठरतं. […]

सरकारी शाळा बंद का पडत आहेत?

भारत जगातील प्राचीन देशापैकी एक देश आहे.येथील संस्कृती ही प्राचीन आहे. भारतातील शिक्षण देणे घेणे ही प्रक्रियाही प्राचीन काळापासून निरंतरपणे चालू आहे.येथे गुरु शिष्यांची परंपरा प्राचीन अनादी काळापासून चालत आलेली आहे.प्राचीन काळातील शिक्षण हे विशिष्ट वर्गातील ,जातीतील लोकांनाच दिले जाई. शिक्षण सर्वांसाठी उपलब्ध नव्हते. […]

बिस्कुट

पन्नास वर्षांपूर्वी आमच्या खेडेगावात माझ्या काकांचं किराणा मालाचं दुकान होतं. त्या दुकानात सर्व जीवनावश्यक वस्तू विक्रीला होत्या. दुकानात सारखी येणारी गिऱ्हाईकं म्हणजे लहान मुलंच असायची. त्यांची खरेदी असायची ती गोळ्या व बिस्कीटांची! पाच, दहा पैसे देऊन हातात दिलेली बिस्कीटं घेऊन ती धूम पळायची. त्याकाळी बिस्कीटांचे मोठे पुडे मिळायचे. प्राणी, पक्ष्यांच्या आकाराची ती बिस्किटे आकर्षक दिसायची, शिवाय […]

1 5 6 7 8 9 10
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..