फास्टफूड किंवा जंकफूड म्हणजे नक्की काय ?
ज्या पदार्थांमध्ये उष्मांक किंवा कॅलरीज खूप जास्त प्रमाणात असतात व इतर पोषक द्रव्ये अगदीच कमी प्रमाणात असतात, असे पदार्थ फास्टफूड किंवा जंकफूड या प्रकारात मोडतात. हे पदार्थ नैसर्गिक अन्नपदार्थांवर प्रक्रिया करून रिफाइन करून बनविले जातात. फास्टफूडची उदाहरणे म्हणजे बटाट्याचे तळलेले चिप्स, फ्रेंच फ्राइज, बर्गर, चीझ पिझ्झा, (कारबोनेटेड) बाटलीबंद शीतपेय, इन्सटंट नूडल्स, बेकरीचे पदार्थ- (क्रीम) बिस्किट, कुकीज […]