July 2023
स्त्री: विविध अनुभूतींनी परिपूर्ण एक अजूबा
‘स्त्री म्हणजे काय आहे?’ या प्रश्नाचे एका शब्दात उत्तर देता येईल. स्त्री म्हणजे एक ‘अजूबा’ आश्चर्य आहे. परमेश्वराची अजोड निर्मिती आहे. उत्पत्ती, स्थिती आणि लय या निसर्गाच्या परिचक्रातील पहिली महत्त्वाची गोष्ट. उत्पत्ती – म्हणजे एखादी गोष्ट निर्माण होणे. स्थिती – म्हणजे पृथ्वीवरील एखाद्या गोष्टीचे अस्तित्व आणि तिसरी स्थिती – लय म्हणजे एखादी गोष्ट संपून जाणे, विलय पावणे, मृत्यू. सर्व सृष्टी या परिचक्राला बांधलेली आहे. परंतु यातील – निर्मिती, उत्पत्तीची ताकद महत्त्वाची आहे. […]
कालचक्र
संवाद सारा हरवला आता कुणा कुणासाठी वेळ नाही धडपड फक्त जगण्यासाठी जीवाला कुठेच शांती नाही… जन्मदात्यांचे स्पर्श बोलके ते सुख कधी विसरलो नाही रुजले बीजांकुर संस्कारांचे विद्रोह मनास शिवला नाही. आज संवेदनाच निर्जीवी सहृदयता, उरलीच नाही अतृप्त, हे श्वास अशाश्वत दुजे वास्तव जगती नाही. कालचक्र गतिमान अविरत कुठे थांबावे कळतच नाही जगव्यवहार स्वार्थात गुंतले आपुलेपण ते […]
जगातील सर्वात जुनी भाजी – भरल्या वांग्याचा रस्सा
भारतीय रेसीपीज इतर कोणत्याही रेसीपीज पेक्षा कलात्मक आहेत, चविष्ट आहेत आणि आरोग्यदायी सुद्धा आहेत यात शंकाच नाही, फक्त भारतीयांना स्वतःला प्रोजेक्ट करता येत नाही इतकेच. […]
सावली
जरी मी चालतोही एकटा असे तुमची सावली सोबती धरुनीया बोट जन्मदात्यांचे कृपाळु, चालवितो सुखांती… भेटता सहृद तुम्हासारखे रुजली अंतरी भावप्रीती अरुपाचे रूपडेही आगळे दृष्टांत सावलीत उजळीती… सत्कर्मे अनुभवता दुनिया सावलीत ब्रह्मानंदी तृप्ती… जे जे पेरावे ते तेच उगवते कृतज्ञतेतुनी ओसंडते मुक्ती… अशा भावनांच्या प्रेमादरात सावलीसंगे निर्मली मन:शांती… प्रांजळ प्रेमची सदा देत रहावे फुलवित जावी निष्पाप प्रीती… […]
ज्युबिली वास्तु
बैजु बावरा’ चित्रपटाचा कधी उल्लेख झाला की, त्यातील शांत व निर्विकार चेहऱ्याचा नायक, भारत भूषण सर्वांना आठवतोच… या नशीबवान भारत भूषणला, मधुबाला व मीना कुमारी सारख्या सुंदर नायिका मिळाल्या.. त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी वांद्रे येथील कार्टर रोडवरील समुद्रकिनारी एक बंगला खरेदी केला. पुढे हाच बंगला राजेंद्र कुमार यांनी भारत भूषण यांचेकडून अवघ्या साठ हजार रुपयांत खरेदी केला व त्याला नाव दिले, ‘डिंपल’!! […]
विमानांपेक्षा मोटारींचे अपघात जास्त का?
आपल्या देशात फार मोठ्या संख्येने वाहने रस्त्यावर असतात. त्यातही काही सावकाश चालणारी तर काही वेगवान असतात. आकाशात तसे नसते. काहीवेळा विमाने उतरताना किंवा वर जाताना गर्दी असते पण सगळे काम क्रमवारीने होते. कोणी मध्ये घुसत नाही. विमानाच्या हालचालीत नियंत्रण असते आणि त्यात सुसूत्रता असते. […]
संगव्वा…
‘ये कडुभाड्या, तुज्या तोंडात माती घातली तुज्या…’ कोंबडा आरवायच्या आत संगव्वाची अशी शिवी ऐकल्यावरच गल्ली उठायची. तुराट्याच्या झाडूने झाडण्याचा खर्रखर्र आवाज आणि संगव्वाच्या आरडाओरड्याने दिवसाची सुरूवात व्हायची. आजही कुणीतरी मुद्दाम किंवा नकळत तिची खोड काढलेली होती किंवा झाडलेल्या जागेत पचकन थुंकले होते. तिचा तोंडपट्टा तोफेप्रमाणे धडधडू लागला. गल्लीतून वळून ती व्यक्ती दिसेनाशी होईपर्यंत ती आपल्या पोतडीतल्या […]
शब्द बापुडे केवळ वारा
पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश ही पंचमहाभूते म्हणून ओळखली जातात. पैकी पृथ्वीच्या आधारानेच सगळे जीवन चालते आणि आप म्हणजे पाणी हे तर मूर्तीमंत जीवनच. तेजोमय लोहगोल म्हणजे भगवान् सूर्यनारायण वायू आणि आकाश या दोन गोष्टींचा संदर्भ सहजासहजी लागत नाही. […]
सैन्यदलातील मिग विमानाचे अपघात जास्त का?
वरवर पाहता मिग विमानांचे अपघात जास्त वाटले तरी दर दहा हजार तासांच्या उड्डाणांच्या हिशेबात जगातील अनेक प्रगत वायुदलातील अपघातांपेक्षा हे प्रमाण कमी आहे. म्हणजे भारतातील व्यावसायिक वैमानिकच काय पण शिकाऊ वैमानिकही इतर देशांच्या तुलनेत अधिक कसबी आहेत. पण तरीही अपघात हा अपघातच आणि तो वाईटच. म्हणून तो पुन्हा होऊ नये यासाठी काळजी घ्यायला हवी आणि त्यातून काही शिकायला हवे. […]