नवीन लेखन...

रेल्वे ट्रॅक

प्रत्येकाच्या दैनंदिन जीवनातील प्रवासात काही गोष्टीचे महत्व असते. त्यामध्ये काही जणांना लोकलचे, तर काहींना बसचे. तर काहींना रिक्षाचे, मला मात्र रेल्वे ट्रॅकचे लहानपणी आमच्या गावातील रेल्वे ट्रॅक आमच्या जीवनाचा भाग होता. आमची वसाहत या ट्रॅक मुळे दोन भागात विभागलेली होती. […]

चल ये पटकन….

चल ये पटकन खूप घट्ट मिठी मार,अरे बघ थोडी अजून जागा शिल्लक आहे, मिटवायचं आहे ना हे पण अंतर मग सांगते तसं कर ना, घट्ट घट्ट अजून घट्ट मिठी मार! बघ तू मी जे सांगते ते ऐकतच नाहीयेस, एका जागेवरून कणभर हलत सुद्धा नाहीयेस! नुसतं एक टक बघत राहतोयस माझ्याकडे, लुक्स काय देतो ? असं विचारल्यावर […]

‘लीप’ सेकंदाची दुरुस्ती

लीप सेकंदाची दुरुस्ती काही लीप वर्षाप्रमाणे नियमित नसते. ती दुरुस्ती सुचवण्याचे अधिकार ब्यूरो इंटरनॅशनल टेम्स (बिट) यांना आहेत. त्यांना इंटरनॅशनल अर्थ रोटेशन सर्व्हिस यांची मदत होते. त्यांच्या सूचना जगातील 50 अत्यंत अचूक अशा आण्वीय पहचाळ बाळगणा या प्रयोगशाळांकडे पाठवण्यात येतात. विशिष्ट अणू-रेणूच्या आंदोलनावरील कार्यपद्धती असलेली घडचाळे अचूक असतात. (प्रतिदिन ती घड्याळे एक अब्जांश सेकंदाची चूक करू शकतात.) […]

वांझोटी

रिता माझा पाळणा अन रीती माझी झोळी गं! रीती माझी ओटी अन नशिबाची खोटी गं! कुणा सांगू यातना, कुणा देवू दोष रं? रित्या माझ्या काळजाला, कुणाची ओढ रं? वांझ माझी ओटी त्यात माझा काय दोष रं? आई माझ्या आत्म्यातील तिला नाही झोप रं! पान्हा देऊ कुणा अन् कुणा देवू ऊब रं? आईपणाची झाली खोटी, ममतेची दोरी […]

ध्यानचंद नॅशनल स्टेडियम

भारताचा माजी हॉकी खेळाडू मेजर ध्यानचंद यांच्या सन्मानार्थ या मैदानास ध्यानचंद स्टेडियम असे नाव देण्यात आले. ध्यानचंद नॅशनल स्टेडियम हॉकी प्रमाणेच क्रिकेट सामन्यांसाठीही प्रसिद्ध आहे. […]

आग्यामव्हळाचा भडका अन वानरायचा तडाखा !

सोंडू पाटलाच्या शेतातं भैमूंग सोंगायची लगबग चालू व्हती.नव्हाळीच्या चार शेंगा लेकरायच्या तोंडी लागतील मणून सगळं गांव पाटलाच्या शेतात उलथलं व्हत.त्याल कारणबी तसच होतं.सोंडू पाटील गावातला दिलदार माणूस समजला जायचा,पण परतेक्षात मात्र त्यो लयचं बेरकी आन धुर्त व्हता.! […]

अरुणोदय – कुरुंदवाड संस्थान – कृष्णाकाठ

कृष्णाबाईच्या काठावरच्या त्या आसमंतात त्या भल्या पहाटे सुखद गारवा होता. नदी संथ वाहात होती. धुक्याचा मुलायम पदर नदीवर … शेतशिवारांवर पसरलेला होता. घाटावरच्या देवळातल्या घंटांचा मंद नाद मनाला सुंदर स्पर्श करत होता. काकड आरतीची वेळ समीप येत होती. […]

समृद्धी आणि विनाश या सिंचनाच्या दोन बाजू कशा?

पाणी जीवनामृत आहे. वनस्पती आणि प्राण्यांच्या शरीरक्रिया पाण्यामुळेच शक्य होतात. मनुष्याच्या आणि काही प्राण्यांच्या शरीरात ७० टक्के पाणी असते. टोमॅटो, कलिंगड या पिकात तर त्याहून जास्त पाणी असते. ताण बसून कोमेजणाऱ्या झाडांना पाणी दिले की, ते तरारते. म्हणूनच म्हणतात, ‘ए फर्टाइल लॅण्ड विदाऊट वॉटर इज देझर्ट. […]

मडेलिना लविन – दुसऱ्या महायुद्धातील स्त्री गुप्तहेर

मडेलिनचा जन्म लियॉन फ्रांस येथे झाला.तिचे वडील एक fabric designer होते. मडेलिनचे लग्न 19 व्या  वर्षी मारसेल लवींज बरोबर झाले.तिला दोन मुले  झाली गाय आणि नोएल,  तिच्या नवऱ्याला दुसऱ्या महायुद्धात तुरुंगवास झाला.पण  त्याला 1943 मध्ये जर्मनीने सोडून दिले. पुढे त्या दोघांत पटेनासे झाले. […]

1 6 7 8 9 10 13
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..