नवीन लेखन...

पेन ड्राईव्ह

पेन ड्राईव्ह हे हाताळण्यास अत्यंत सोपे फ्लॅश मेमरीवर आधारित साधन आहे. हा पेन ड्राईव्ह यूएसबी पोर्टमध्ये खोचून आपण हवी ती माहिती त्यात घेऊ शकतो. यूएसबी याचा अर्थ  युनिव्हर्सल सीरियल बस असा आहे. […]

वरदलक्ष्मी व्रत

श्रावण मासातील शुक्लपक्षातील शेवटच्या शुक्रवारी वरदलक्ष्मी व्रत केले जाते. कलशावर वरदलक्ष्मी स्थापन करून श्रीसूक्ताने देवीची पूजा करतात. २१ अनरश्यांचा नैवेद्य अर्पण करतात. या व्रताचे फळ व्याधीनाश असे आहे. दक्षिण भारतातदेखील हे व्रत आषाढ महिन्यातील शुक्लपक्षातील अखेरच्या शुक्रवारी करण्याची रीत आहे. -श्री करंदीकर गुरुजी

सीसीटीव्ही (क्लोज सर्किट टीव्ही)

अगदी छोट्या दुकानांपासून ते मोठ्या मॉलपर्यंत सगळीकडेच ग्राहकांवर लक्ष ठेवण्यासाठी एक उपकरण लावलेले असते ते म्हणजे क्लोज सर्किट टीव्ही. त्याच्या मदतीने आतापर्यंत अनेक गुन्हे उघडकीस आले आहेत. किंबहुना रस्त्यांवरही महत्त्वाच्या ठिकाणी क्लोज सर्किट कॅमेरे लावलेले असतात. टेहळणी हा सीसीटीव्हीचा एक प्रमुख उपयोग आहे. […]

शोध अस्तित्वाचा

दिवसभराच्या दगदगीने शिणून अंग अंथरुणावर टाकले. तेव्हा वाटलं, लौकिकार्थाने आपला संसार पूर्ण तर झालाय. पण अजून आपली ह्या प्रपंचाच्या जोखडातून सुटका मात्र नाही. आजही मुलगा, सून, नातवंड, नवरा कशातून मोकळीक नाही. आपण स्वतःसाठी कधी जगलोच नाही. ते काही नाही. आता सोडवून घ्यायचं सगळ्यातून स्वतःला तिच्या मनात एक अभिनव कल्पना आली. […]

पंचामृत महात्म्य

पंचामृत स्नानं समर्पयामि ’गणपतीची पूजा असो सत्यनारायणाची पूजा असो की त्या षोडषोपचार पूजेत पंचामृताचा वापर असतोच असतो. देवाला नैवेद्य म्हणून आपण पाच फळे ठेवतो. व पूजेनंतर आपण ते प्रसाद म्हणून ग्रहण करतो. पण या सगळ्याच्या मागे आपल्या शास्त्राचा इतका सखोल विचार व अभ्यास दडला आहे हे आपण समजून घेणे गरजेचे आहे. […]

हे पण घेणार का?

एखादी गोष्ट आंतरजालावरून विकत घेतल्यानंतर सतत संगणकावर येणाऱ्या जाहिराती आणि आपल्या भ्रमणध्वनीवर सतत येणारे संदेश पाहून आपल्याला प्रश्न पडतो की, मला काय हवे आहे, हे या लोकांना कसे कळते? याच प्रश्नाची एक उकल पाहणार आहोत आपण या लेखामध्ये… […]

साहित्यिक ठाणे – जुने आणि नवे

साहित्यिक – ठाणे आणि नवे या संबंधात मी जेव्हा विचार करू लागलो तेव्हा आदराने ज्यांच्यापुढे नतमस्तक व्हावे असे श्रेष्ट साहित्यिक महाराष्ट्र सार-स्वतकार वि. ल. भावे (१८७१-१९२६) यांचेच नांव मला सर्वप्रथम आठवले. संत वाङ्मयासंबंधी त्यांनी केलेले संशोधन व त्या आधारे लिहिलेला ‘महाराष्ट्र सारस्वत’ हा ग्रंथ म्हणजे मराठी साहित्यातील एक मौलीक ठेवा आहे. […]

हयग्रीवोत्पत्ति

श्रावण पौर्णिमेला भगवान विष्णूंच्या हयग्रीव अवताराची उत्पत्ति झाली. हयग्रीवाच्या उत्पत्तिबद्दल निरनिराळ्या कथा आढळतात. याची मूर्ती कशी असावी याबद्दल पांचरात्रात सांगितले आहे. चार हातांचा, तीन हातात शंख, अक्षमाला, व चौथा हात व्याख्यान मध्ये. याच्या मूर्ती कर्नाटकांत नुग्गेहळ्ळी येथे आहेत. मूर्ती उभी, अष्टभुजा, पायाखाली राक्षसाला तुडवणारी आहे तर दुसरी चतुर्भुज, विश्वपद्मावर बसलेली आहे. -श्री करंदीकर गुरुजी

नारळी पौर्णिमा

श्रावण महिन्यातील पौर्णिमेला नारळी पौर्णिमा साजरी केली जाते. पावसाने समुद्राला उधाण आलेले असते त्या प्रीत्यर्थ समुद्राला नारळ अर्पण करतात हा प्रमुख विधी आहे. या दिवशी नारळाचे पदार्थ बनवून त्याचा नैवेद्य अर्पण करतात. या सणाचे महत्त्व विशेष करून समुद्रकाठच्या भागात जास्त आढळते. नारळी पौर्णिमेनंतर कोळी मंडळी समुद्रात मच्छीमारीस जातात. त्याप्रित्यर्थ समुद्राचे पूजन करतात. -श्री करंदीकर गुरुजी

रक्षाबंधन

श्रावण महिन्यांत पौर्णिमेचे दिवशी रक्षाबंधन नावाचा विधी करतात. पूर्वी आतासारखा हा सण नव्हता. पूर्वी तांदूळ, सोने व पांढऱ्या मोहऱ्या एकत्र करून त्यांची पुरचुंडी बांधून रक्षा अर्थात राखी तयार करीत. ती राखी मंत्र्याने राजाला बांधावी असे सांगितले आहे. असाच विधी भविष्य पुराणातही सांगितला आहे. इतिहास कालापासून याची नूतन प्रथा सुरु झाली. या काळात बहीण भावाला राखी बांधू […]

1 2 3 19
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..