संस्कृत साहित्यातील प्रवास
पर्यटन विशेषांकासाठी संस्कृत साहित्यातील मेघाचा रामगिरी ते अलका व्हाया उज्जैन असा प्रवास किंवा रघुवंशातील रामाने सीतेसह वानर आदींचा घडलेला लंका ते अयोध्या प्रवास या दोन विषयांबाबत काही लिहाल का? अशी विचारणा झाली. त्याला पूर्वी कधीतरी मीच उल्लेख केलेल्या डॉ. भावे आणि डॉ. सोहोनी यांच्या सदीप व्याख्यानाच्या स्मृतीची पार्श्वभूमी होती पण मग मी म्हटलं, त्या प्रवासांवर स्वतंत्र पुस्तके प्रकाशित झाली आहेत […]