नवीन लेखन...

कृष्णमेघना

झाकोळल्या नभांगणी कृष्णमेघना अनावर… जीवा, ध्यास श्रावणी सरसरसर धारा सुंदर… वर्षा ऋतू बरसणारा स्पर्श ओलेता मनोहर… शब्द गझला अर्थवाही भावगंधी ओंजळ सुंदर… चिंबचिंबली पानफुले झुळझुळतो नाद सुंदर… अतर्क्य रूप चैतन्याचे लावण्य रुपडेच मनोहर… नाचत नाचत येते वर्षा ओथंबलेले गगन सुंदर…. रचना क्र. ७८ २०/७/२०२३ -वि.ग.सातपुते.(भावकवी) 9766544908

श्रवणभक्ती

विश्वाचे नियंत्रण करणाऱ्या सर्वसत्ताधीश परमात्म्याविषयी अंतःकरणात प्रेम निर्माण होणे याचे नाव भक्ती. ही सारी सृष्टी त्या ईश्वराचीच विविध रूपे आहेत असे वाटू लागणे, त्याअनुरूप आपला व्यवहार होणे ही भक्तीची परिसीमा […]

अन्यायाविरुद्ध आवाज – कवयित्री नेली जाक्स

केवळ यहुदी असल्यामुळे तिला बरेच काही भोगावे लागले. याचेच अनुभव तिने आपल्या कवितेत मांडले आणि तिच्या उत्कृष्ट कवितांना १९६६ साली साहित्याचा नोबेल पुरस्कार विभागून मिळाला. सॅम्युअल जोसेफ अग्नान हे आणखी एक लेखक तिच्याबरोबर नोबेल पुरस्काराचे सहविजेते होते. या कवयित्रीचे नाव होते नेली जाक्स. […]

सर्वसाधारण अणुभट्टी कशी चालते?

आजच्या अणुभट्ट्या या अणुकेंद्रकीय विखंडनावर आधारित आहेत. या अणुभट्ट्यांच्या गाभ्यातील महत्त्वाचे घटक म्हणजे इंधन, मंदायक, शीतक आणि नियंत्रक कांड्या. […]

गॅस आणि इलेक्ट्रिक वॉटर हीटर

१८६८ मध्ये लंडन येथे बेंजामिन वॅडी या पेंटरने पहिल्यांदा वॉटर हीटर तयार केला, त्याला गिझर असे नाव होते. त्यामुळे आजही आपण गिझर हा शब्द वॉटर हीटरला नेहमी वापरतो. १८८९ मध्ये एडविन रूड या नॉर्वेच्या इंजिनियरने अधिक प्रगत असा इलेक्ट्रीक वॉटर हीटर तयार केला. […]

पाहारेदार

सातपुड्याच्या पायथ्याशी येळकोटवाडी नावाचं गाव व्हतं. साधारण दीड दोन हजार वस्तीचं गाव.. गाव तसं लहानच… गावाला खंडूबा प्रसन्न व्हता… गावात शिरताच म्होहर च खंडूबाचं देवुळ व्हतं …या खंडूबाच्या देवळाच्या रावळात एक माणूस बशेल असायचा… दिसा तो नसायचा पण रातीला तो तिथंच गवसायचा… त्याचं नाव पांडबा… […]

पुरुषपण भारी देवा

कायओ?काय चाललंय!बसले का लॅपटॉप उघडून!रविवार आहे ना?तरी सुद्धा काम?बाहेर मस्त पाऊस पडतोय..छान वातावरण आहे..चल जावू कुठंतरी!नाहीतर फिरायला..सिनेमाला नाटकाला!स्वतःहून कधी म्हणायची इच्छा होत नाहीका हो तुम्हाला?म्हटलं आज उद्या कधीतरी स्वतःहून म्हणाल..चल जावू या ‘बाईपण भारी देवा’ सिनेमाला!पण कसलं काय!आपल्या सोसायटीतल्या सगळ्या जावून पाहून सुद्धा आल्या!त्याचं कायये कामा शिवाय काहींचं सुचत नाही ना आम्हाला!एक सांगा!आपण दोघं शेवटचं बाहेर कधी गेलो आठवत का?घरातलं करा तुमचं बघा!राब राब राबा.. सुट्टीची वाट पाहत रविवार पर्यत थांबा!पण नाही..बायकोला समजून घ्यायचंच नाही म्हटल्यावर इलाजचं खुंटला..खरंय ना? […]

अणुभट्टीत वापरली जाणारी इंधनं

अणुभट्टीत वापरता येणारी युरेनिअम व्यतिरीक्त दोन इंधन म्हणजे प्लुटोनिअम आणि थोरिअम ही मूलद्रव्यं. यातील प्लुटोनिअम हे मूलद्रव्य निसर्गात उपलब्ध नसून ते अणुभट्टीतच तयार होतं. […]

आहारशास्त्र

सृष्टीमध्ये मनुष्यप्राण्याच्या स्वास्थ्याकरिता ज्या वस्तू निसर्गाने निर्माण केल्या आहेत, त्यांत धान्याचा पहिला नंबर लागतो. यास्तव खाद्यदृष्ट्या धान्याचे महत्त्व समजून घेऊन त्याची लागवड व पैदास जगातील सर्व देशांत फार मोठ्या प्रमाणात करतात; परंतु या धान्यरूपातील वस्तूंच्या व्यतिरिक्त दुसऱ्या आणखीनही वस्तू निर्माण झाल्या. त्यांत फळफळावळ व भाज्या यांचा पोषणदृष्ट्या सहायक म्हणून उपयोग होतो. […]

वॉटर हीटर (सोलर)

भारत हा उष्णकटिबंधातील देश असल्याने आपल्याकडे पावसाळ्याचे चार महिने सोडले तर बाकीचे दिवस सूर्यप्रकाश असतो. सहस्ररश्मी सूर्याची फुकट मिळणारी ऊर्जा वापरणे हा खरेतर इंधन टंचाईवरचा एक पर्याय आहे. पाणी तापवण्यासाठी आपण घरातील किमान २५ टक्के ऊर्जा खर्च करीत असतो ती वाचवता आली तर विजेचा किंवा गॅसचा वापर टाळल्याने प्रदूषण होणार नाही. […]

1 9 10 11 12 13 19
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..