आयुष्यातले डिलीट
संध्याकाळची साडेसात, आठ ची वेळ. आज शाळेत एकही ऑफ पीरियड नव्हता. त्यामुळे घरी आल्यावर खरतर, डोकं जाम कलकलत होतं. पण सासर्यांना रोज रात्री चारी ठाव स्वयंपाक लागत असल्याने, भराभर पोळ्या करत होते, आणि फोन वाजला. पोळी भाजणे सुरू ठेवून, डोकावून फोन मध्ये पाहिले, तर नीता फोन करत होती. मनात आले, “आता ही का फोन करत असेल?” […]