नवीन लेखन...

स्टेथोस्कोप

पूर्वीच्या काळात नाडीपरीक्षेवरून रागनिदान केले जात असे. हृदयाचे ठोके ऐकून वैद्यकीय तपासणी करण्याची पद्धत नंतर रूढ झाली. इ.स. १८०० सुरुवातीच्या काळात फ्रान्समध्ये रेने लॅनेक नावाचा एक डॉक्टर होता. तो हृदयाचे स्पंदन ऐकून रोगनिदान करीत असे. त्यासाठी तो रुग्णाच्या छातीला कान लावून हृदयाचा लब-डब हा आवाज ऐकत असे. एकदा त्याच्याकडे एक तरुण स्त्री आली. आता त्याची चांगलीच पंचाईत झाली. […]

डीएनए कॉम्प्युटर

डीएनए आणि कॉम्प्युटर (संगणक) यांचा काय संबंध असे कुणालाही वाटेल यात शंका नाही पण सजीवांच्या शरीरात माहिती साठवणाऱ्या डीएनएचा वापर संगणकासारखा करता येतो हे आता संशोधनाअंती सिद्ध झाले आहे. आपल्या नेहमीच्या संगणकात मायक्रोप्रोसेसर ही चिप असते, तर डीएनए कॉम्प्युटर या नॅनोकॉम्प्युटरमध्ये ही जागा डीएनए सांभाळत आहे. […]

अग्रलेखांचा दबदबा

२५ जून १९७५ रोजी देशात आणीबाणी जाहीर झाली. वृत्तपत्रांवर सेन्सॉरशीप आली. कोणतीही बातमी, लेख छापण्याच्या आधी तो मजकूर माहिती खात्याच्या अधिकाऱ्यांना दाखवून मंजूर करून घेणे बंधनकारक झाले. जे अधिकारी वृत्तपत्रात सरकारचे लेख छापून यावेत म्हणून संपादकांच्या मागे पुढे अजिजी करायचे त्यांच्याकडेच जाऊन संपादकांना आपण उद्या जे काही छापणार आहोत ते तपासून घेण्याची वेळ आली. त्यामुळे वृत्तपत्रसृष्टीत त्यावेळी मोठा असंतोष निर्माण झाला. […]

तिसरा अंक

सर्वप्रथम वसन्तरावांचे त्यांच्या अध्यक्षपदाबद्दल नाट्य-वेड्या त्यांच्या चाहत्यांच्यावतीने व निर्मात्यांच्यावतीने अभिनंदन करणं महत्वाचं आहे. त्यांचं अभिनंदन करून मगच मला वाटलेले म्हणा किंवा पटलेले म्हणा वसन्तराव कानेटकर ह्यांच्याबद्दल माझ्या लेखणीला पेलवेल असे चार म्हणा किंवा चारशे म्हणा शब्द लिहायचं मी ठरवलं. […]

टोनी मारिसन – कादंबरी नव्हेच कविता

काव्यमय भाषेमुळे तिचे गद्य लेखनही पद्यमय झाले. तिची कादंबरी हीच एक कविता बनली. त्यामुळे साहजिकच तिला १९९३ मध्ये साहित्यविषयक नोबेल पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. टोनी मारिसन हे तिचे नाव. […]

सुखस्वप्न

शांतनू सगळी तयारी दिलेल्या यादीप्रमाणे घेऊन आला. पुन्हा पुन्हा काही राहिलं नाही ना ते बघून तो बाईकवर बसला. तिथूनच त्याने शाल्मलीला फोन लावला. शाल्मलीने हसतच फोन उचलला. आणि त्याने काहीही बोलायच्या आत तीच बोलली, “ शालू, तू सांगितल्याप्रमाणे सगळं घेतलं आहे. […]

एटीएम मशीन

अलीकडच्या काळात आपल्याला फार वेळा बँकेत जायची वेळ येत नाही कारण पैसे काढण्याचे मुख्य काम हे तर एटीएम मशीनच्या मदतीने होत आहे. आपल्याकडे बऱ्याच उशिरा हे तंत्रज्ञान आले असले तरी प्रगत देशात त्याचा वापर अगोदरच सुरू झाला होता. एटीएम याचा अर्थ ॲटोमेटेड टेलर मशीन असा आहे. […]

लोकशाहीचे पसायदान

भारत सरकारने आयपीसी सीआरपीसी आणि एव्हिडन्स ऍक्ट मध्ये बदल करून स्वातंत्र्याचे स्वराज्यात रूपांतर करण्याची पावले उचलण्यास सुरुवात केलेली आहे. आता आपण ज्ञानेश्वर माऊलींना त्यांनी मागितलेले पसायदान देण्याची मानसिक आणि कायदेशीर तयारी सुरू केलेली आहे असे मला वाटते. ज्ञानेश्वर माऊलींचे पसायदान हे नागरीकांनी भारत सरकार कडून पूर्ण करून घेण्याच्या नागरी आधिकारांची आणि सुविधांची शॉर्टलिस्टच आहे. […]

अष्टविनायका तुझा महिमा कसा

गणपती संदर्भात वेगवेगळे चित्रपट आले असतील परंतु अष्टविनायक गणपतींचा संदर्भ असलेला तोपर्यंत एकही चित्रपट नव्हता आणि आता असे म्हणावे लागेल आणि अजूनतरी या विषयासंदर्भात कोणी चित्रपट निर्माण केलेला नाही. हे ‘अष्टविनायक’ चित्रपटाचे वेगळेपण म्हणता येईल. […]

शिव्या

माणसाच्या तोंडात सदैव असलेली गोष्ट म्हणजे शिवी. क्रोध,तिरस्कार व्यक्त करण्यासाठी त्यांचा उपयोग होतो. त्या सर्वच भाषेत उपलब्ध आहेत. कधी राग आला म्हणून तर कधी राग यावा म्हणून शिव्यांचा उपयोग होतो.अगदी जन्मापासूनच त्याचे बाळकडू मिळते. […]

1 2 3 4 19
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..