ज्येष्ठ हो तुमच्यासाठी
विज्ञानाची प्रगती, वैद्यकीय उपचार, लोकात आरोग्याविषयी निर्माण झालेली सजकता यामुळे आयुर्मान वाढले आहे. तथापि, वृद्धापकाळात अनेक समस्या निर्माण होत आहेत. सर्व समस्यांना तोंड देण्याची अनेकांच्या मनाची तयारी झालेली नसते. त्यांचे एक कारण म्हणजे मागच्या पिढीतील त्यांचे आईवडील एवढे जगलेले नसतात. दुसरे आपली मुले चांगली आहेत आणि ती वृद्धापकाळात आपली व्यवस्थित काळजी घेतील. या भाबड्या समजुतीत अनेक असतात. […]