नवीन लेखन...

कृपाळु कनवाळू

मोहरलेल्या सृष्टी गर्दी पर्णफुलांची झुळझुळतो वारा मस्ती भावनांची… निसर्गाची जादुई प्रचिती प्रसन्नतेची ठेवा चैतन्याचा उधळण आनंदाची… कवटाळीता सुखा साक्ष स्वर्गसुखाची स्पर्श मांगल्यमयी अनुभूती देवत्वाची… जीवन व्हावे पावन ही भावनां अंतरीची तो कृपाळु कनवाळू आंस त्याच्या कृपेची… रचना क्र.९४ ३/८/२०२३ वि.ग सातपुते (भावकवी) 9766544908

कोलंबिया अवकाशयानाच्या अपघाताच्या निमित्ताने

3 फेब्रुवारी 2003 ला अमेरिकेतील नासा संस्थेने अवकाश मोहिमेवर पाठविलेल्या कोलंबिया अवकाशयानाचा परतीच्या प्रवासात स्फोट झाला आणि मूळ भारतीय असलेल्या कल्पना चावलासह सात अंतराळवीर यात मृत्युमुखी पडले. या अपघातासंदर्भात प्रसिद्ध होणारी माहिती व अनेक तांत्रिक चुका विसंगतीसहं वाचकांपर्यंत पोहचवली ग?ली. त्यासंदर्भात 2003 मध्ये केलेल्या ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. वसंत गोवारीकर यांच्या मराठी विज्ञान परिषद येथे झालेल्या भाषणाचा गोषवारा. […]

श्रावणसरी

बरसता श्रावणसरी,मन पाखरून जाई, ओली ओली हिरवळ,मन हारकुन जाई. आला श्रावण घेऊन,सखे घन काळेभोरं, त्यांनी बरसुन गेले,देले सुखाचे आंधनं. आंधनात तिलं आलं,नच पाणी ते जिवनं, धरू घटाघटा पिई,मिटे व्याकुळ तहानं. पशु-पक्षी,झाडं वेली,डौल डौलती डौलातं, नक्षी शोभे फुलं वेलं,शोभे कोंदनं गोंदनं. लेणं आहेव हिरवं,काळी करे हिरवा तालं तिचा आहेव शृंगार,भाळी शोभे फुल लालं. आहेव काळी धरूमायं,तिनं लेला […]

नागपंचमीची धमाल

आजही लहानपणचा तो किस्सा आठवला की मलं खूप खुप हसू येतं.ते झाड,ते सणाचे वातावरण,त्या परंपरांना मी खुप मिस करतो. त्या सगळ्या गमती जमती आता इतिहास झाल्यातं असं वाटाया लागतं..आताशा गावंही बदललीतं,हिरवाई कमी होऊन तिथबी सिमेंटचे जंगलं वाढलीतं.काळासंगटच परंपराबी बदलल्यातं…आठवणी मात्र तशाच आहेत….!!! […]

फॅक्स मशीन

आजच्या संगणकाच्या युगातही जे जुने तंत्रज्ञान अजूनही टिकून आहे ते म्हणजे फॅक्स मशिन. ॲलेक्झांडर ग्रॅहम बेलने १८७६ मध्ये मिस्टर वॉटसन, कम हियर आय वाँट टू सी यू हे शब्द टेलिफोनवर उच्चारले, तेव्हा तो दूरसंचार क्रांतीचा पितामहच ठरला. नंतरच्या काळात याच तंत्रज्ञानाचे अनेक आविष्कार आपण पाहिले. […]

सुवर्णयुगाचा वारसाः लेणी

सध्या गड-कोट – किल्ले ह्यासंबंधी खूपच कुतूहल वाढलेले आहे. ह्याठिकाणी पर्यटकांची रीघ लागलेली आहे आणि हे उत्तमच आहे. अगदी त्याचप्रमाणे पर्यटकांची लेण्यांकडेही रीघ लागू दे, अर्थात अजिंठा, वेरूळ, कार्ले, भाजे आदी लेण्यांकडे रीघ आहेच. पण छोट्या छोट्या उपेक्षित लेण्यांकडेही रीघ लागू दे… […]

लाहोरमधील बाघ-इ-जिन्हा मैदान

बाघ-इ-जिन्हा हे पाकिस्तानातील लाहोर शहरातील एक ऐतिहासिक मैदान आहे. पूर्वी हे मैदान लॉरेन्स गार्डन या नावाने ओळखले जात असे. सध्या मात्र या मैदानाच्या आसपास विविध झाडाफुलांनी बहरलेला मोठा बगिचा आहे. तो बोटॅनिकल गार्डन म्हणून प्रसिद्ध आहे आणि शेजारी एक मशिद आहे. […]

पुण्यस्रोत

निसर्ग हा हिरवळलेला पुण्यस्रोत शुभ्र जलाचा…. दरीदरीतुनी झेपावतो उंच धबधबा डोंगरीचा…. निळ्यानिळ्या अंबरी धुसर पांघर धुक्याचा…. रंग कोवळे सप्तरंगले धुंद सुगंध मृदगंधाचा…. सांजाळल्या सांजवेळी पापणीत भास तृप्तीचा…. समोर वाहते कृष्णामाई साक्षात्कार जणू गंगौघाचा…. रचना क्र. ९२ ३१/७/२०२३ -वि.ग.सातपुते.(भावकवी) 9766544908

डिजिटल घड्याळ

मनगटी घड्याळाचा शोध पॅटेक फिलीप यांनी लावला व गंमत म्हणजे त्याकाळात हे घड्याळ म्हणजे महिलांचे आवडते साधन होते. त्यानंतरच्या काळात क्वार्ट्स घड्याळे आली व कालांतराने त्यांची जागा डिजिटल घड्याळांनी घेतली. १९५६ मध्ये त्यांचा शोध लागला. […]

ती अन् मी

आज हे गाणं ऐकलं आणि तुमच्यासमोर थोडसं व्यक्त व्हावसं वाटलं. कोरोनाच्या काळात बऱ्याच जणांनी बरंच काही गमावलं आहे. पुन्हा माणसाला माणसाची किंमत कळली आहे. पैसा, भौतिक सुखांच्यापेक्षाही कितीतरी पट अधिक माणसांना माणूसच हवा याची जाणीव झाली आहे. […]

1 6 7 8 9 10 19
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..