सुंदरतेची मूर्ती
सुंदरतेचा म्हणजे सुंदर दिसण्याचा ध्यास कोणाला नाही? पुरुष असो की स्त्री, लहान असो की मोठा, खेडयातला असो की शहरातला, पैसेवाला असो की गरीब… सुंदर दिसण्याची धडपड सर्वांचीच आणि सर्वकाळ! सर्वकाळ अशासाठी की आजची तरुणी स्वतःला सजवण्यात जशी मग्न तीच वृत्ती रामायण, महाभारतातील स्त्रियांमध्येही होती! प्रसाधनाची माध्यमं बदलली, सौंदर्याचे निकष बदलले पण स्वतःची आरशातली छबी तद्वत लोकांच्या नजरेतली पसंती, छान या सदरात मोडावी, हाच उद्देश ‘सुंदर मी होणार’ ह्यापाठी असतो. […]